मला भावलेली ऑनलाईन व ऑफलाईन शाळा` निबंध व वकृत्व स्पर्धेत राष्ट्रीय शिक्षण संसथेचे सुयश
डोंबिवली ( शंकर जाधव )   इनरव्हिल क्लब ऑफ डोंबिवली आयोजित गुरुपौर्णिमे निमित्त इ. ५ वी ते १० वी साठी "मला भावलेली ऑनलाईन व ऑफलाईन शाळा “ या  विषयावर आधारित निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेसाठी इंग्रजी व मराठी माध्यमाचे  ७२ विद्यार्थी सहभागी झाले होते. निबंध व वकृत्व स्पर्धेत राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त करून पारितोषीके पटकावली.


          या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यांदिर गोपाळ नगर (माध्य) या शाळेतील त्रिवेणी राजू जाधव, इ . ५ वी प्रथम क्रमांक, हर्षदा शाम संसारे, इ. ५ वी उत्तेजनार्थ चौथा क्रमांक यांनी पारितोषीक पटकावीले. मार्गदर्शक मोनिका पाटील व शाळेच्या माजी मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले आहे. निबंध स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर (प्राथ) शाळेच्या  श्रेया योगेश पाठक इ ५ वी पाचवा क्रमांक, वेदांग मंगेष गराटे, इ ६ वी व व्यकटेश योगेश पाठक ६ वी यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ व तिसरा क्रमांक पटकावून नेत्रदिपक यश मिळवले. 


             सहशिक्षक एकनाथ पवार व नयना पाटिल, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली मुणगेकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले होते. स्वामी विवेकानंद विद्यांदिर दत्तनगर (माध्य.) शाळेचा विद्यार्थी श्रवण प्रविण सावंत याने व्दितिय क्रमांक पटकावला मार्गदर्शक शिक्षिका नेमाडे व शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सुलभा बोंडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.          स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय (माध्य) शाळेच्या कु. मृणाली पाटील या विद्यार्थीनीने वक्तृत्व स्पर्धेत व्दितिय क्रमांक तर कु. अनुष्का राजापुरे हिने तृतीय क्रमांक व  श्रेया लोहकरे या विद्यार्थीनीने उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला.  मार्गदर्शक शिक्षक शिंपी सर व शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांचे मार्गदर्शन मिळाले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी वाघमारे व कार्यवाह डॉ. दीपक कुलकर्णी यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments