Header AD

महाडकरांनी दिल्या ठाणे महापालिका प्रशासनाला दुवा स्वच्छते साठी पालकमंत्री, महापौर व पालिका अधिकारी तळ ठोकून

 

■सलग दुसऱ्या दिवशीही पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची यंत्रणा अधिक गतिमान..


ठाणे , प्रतिनिधी  :  महाड परिसरात महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शहर स्वच्छ करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाचे महाडकरांनी आभार मानत सर्वांना दुवा दिल्या. महाड शहरासाठी सुरू करण्यात आलेल्या "महास्वच्छता" अभियानामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणपत म्हस्के स्वतः रस्त्यावर उतरले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची यंत्रणा अधिक गतिमान करण्यात आली.        यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त शंकर पाटोळे, मुख्याधिकारी जीवन पाटील, वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते.         महाड परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या २०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत जोरदार स्वच्छता मोहीम सुरू असून शहर स्वच्छ करण्यात ठाणे महापालिकेने मोलाची कामगिरी बजावली आहे.          शहरात साचलेल्या मातीचा गाळ, दुकाने तसेच राहत्या घरातील चिखल, कचरा महापालिकेच्यावतीने मशिन्स, जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने उचलण्यात येत आहे.  ठाणे महापालिकेच्या या संपूर्ण कामाचे महाडवासींयांनी भरभरून कौतुक करत प्रशासनाचे आभार मानले.         महाड शहराच्या स्वच्छतेसाठी गेले दोन दिवस राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के तसेच ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. आज दुसऱ्या दिवशीही स्वतः पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी महाड मधील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्वच्छता करून परिसरात धुरफवारणी आणि औषध फवारणी केली.        यासोबतच प्रमुख बाजारपेठ, मुख्य रस्ते तसेच लहान गल्ली बोळ यांची पायी  चालतच पाहणी करून साचलेला चिखल उचलण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनास दिले.आज महाडमधील चवदार तळे, बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विरेश्वर देवालय तसेच इतर स्थानिक मंदिराची व परिसराची स्वच्छता करण्यात आली.          यामध्ये ठाणे महापालिकेच्या ड्रेनेज लाईन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, ५ घंटागाड्या, ठाणे महानगरपालिकेची ६ अत्याधुनिक जेटिंग मशिन्स, फायर ब्रिगेड टँकर्स, टॅंकर्स, स्प्रेइंग मशीनस, रोगराई पसरू नये यासाठी मारण्यात येणारी फोगिंग मशिन्स आदी यंत्रणेच्या माध्यमातून महाड शहरात "महास्वच्छता" मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे.


महाडकरांनी दिल्या ठाणे महापालिका प्रशासनाला दुवा स्वच्छते साठी पालकमंत्री, महापौर व पालिका अधिकारी तळ ठोकून महाडकरांनी दिल्या ठाणे महापालिका प्रशासनाला दुवा स्वच्छते साठी पालकमंत्री, महापौर व पालिका अधिकारी तळ ठोकून Reviewed by News1 Marathi on August 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads