भिवंडीत कंटेनर व टेम्पो चोरीच्या गुन्ह्यात 85 लाखांचा मुद्देमाल जप्त

 
भिवंडी दि 13 (प्रतिनिधी ) तालुक्यातील  दापोडा येथील  गोदमातून कंटेनर मध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस एस सोल्युशन,कनवर कॉन्व्हास , रिव्हाल्युशन ब्युटीया  कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौन्दर्य प्रसायदानाचे साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चवीच्या मदतीने 76 लाख रुपये किमतीचा माल व 5 लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता .         तर दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा गावाच्या हद्दीत चॉकलेट चा 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा माल भरून ठेवलेला टेम्पो उभा असताना रात्रीच्या अंधारात तो अज्ञात चोरट्यांनी पळविल्याच्या घटना दोन दिवसात घडल्याने खळबळ उडाली असताना नारपोली पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणचा मोबाईल तांत्रिक तपास करीत या दोन्ही गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करीत त्यांच्या ताब्यातून एकूण 85 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

Post a Comment

0 Comments