भिवंडी महानगरपालिकेत 74 वा स्वातंत्राचा वर्धापन दिन दिमाखात साजरा.
भिवंडी , प्रतिनिधी  : भिवंडी पालिका मुख्यालयात महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन मुख्य कार्यक्रम पार पडला.तसेच प्रभाग समिती अंतर्गत सर्व  प्रभाग समिती सभापती यांच्या हस्ते  झेंडा वंदन कार्यक्रम  पार पडला. मुख्य झेंडा वंदन कार्यक्रमानंतर राष्ट्रीयपुरुष यांच्या प्रतिमेस, पुतळ्यास, तसेच हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.            यावेळी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर इमरान वली मोहमद खान, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, सभागृह नेते विकास निकम, उपायुक्त दीपक झिंजाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सामान्य प्रशासन विभाग सहायक आयुक्त प्रीतम पाटील, आरोग्य विभाग सहायक आयुक्त प्रीती गाडे, सहायक आयुक्त नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, सर्व प्रभाग अधिकारी दिलीप खाने, फैजल तातली, सुनील भालेराव, सुनील झळके, गिरीश घोष्टेकर अन्य  नगरसेवक,अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी चौकात  पालिका कामगारांना  गणवेशाचे वाटप करण्यात आले.          महापौर प्रतिभा पाटील, उप महापौर इमरान खान, आयुक्त सुधाकर देशमुख,सभागृह नेते विकास निकम,अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी यांना गणवेश व बुट वाटप करण्यात आले.मुख्य झेंडा वंदन कार्यक्रम झाल्या नंतर महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी सर्व उपस्थितांस तंबाखू मुक्ती, तसेच माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण बचाव बाबत  शपथ घेतली.

Post a Comment

0 Comments