मोदी सरकारने "सबका साथ सबका विकास" या मूळ तत्वावर चालून मागील 7 वर्षात गरिबांच्या कल्याणा साठी कटी बद्धता दाखविली- नरेंद्र पवार

 


■भाजपा कल्याण जिल्ह्याच्या ई-चिंतन प्रशिक्षण शिबिरात नरेंद्र पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये भरली ऊर्जा..


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  गोरगरीब, उपेक्षित व वंचित, मागासवर्गीय, शेतकरी, महिला, असंघटित तसेच सर्वच घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबविल्या असून मोदी सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी असलेली कटीबद्धता दाखवून दिल्याचे प्रतिपादन कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केले. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ई चिंतन ऑनलाईन प्रशिक्षण वर्गातील "गरीब कल्याणकारी योजना" विषयावर नरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले.           या मार्गदर्शनाला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आयटी विभाग प्रदेश सहसंयोजक आशिष पावसकर, जिल्हा प्रशिक्षण शिबीर प्रमुख व सरचिटणीस गौरव गुजर, प्रशिक्षण शिबीर सहप्रमुख पुष्पा रत्नपारखी, अथर्व ताडफळे, भाजपा उत्तर भारतीया आघाडी कल्याण जिल्हा अध्यक्ष विजय उपाध्याय तसेच जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस, आघाडी, मोर्चा, सेल, प्रकोष्ठचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.            ई चिंतन प्रशिक्षणाला संबोधित करतांना नरेंद्र पवार म्हणाले की, पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी देशातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी अंत्योदयाची कल्पना मांडली. अंत्योदयाची कल्पना प्राचीन भारतीय तत्वज्ञानावर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७ वर्षात अंत्योदयाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने सात्यत्याने प्रयत्न केले.          गरिबांना परवडणाच्या दरात घरे आणि आरोग्य सेवा, आयुर्विमा उपलब्ध करून देणे, गोरगरिबांची बँकखाते उघडणे, गरिबांना पक्की घरे बांधून देणे, गरिबांना मोफत वीज देणे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणे, ५ लाख रुपयात आयुष्मान भारत योजना यासारख्या निर्णयातून मोदी सरकारने गरीबाच्या कल्याणासाठी असलेली कटीबद्धता दाखवून दिली आहे.          
            कोरोना प्रसार काळात मोदी सरकारने गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक मार्गाने प्रयत्न केले. लाखो गरीब कुटुंबाना मोफत गस सिलेंडर देण्यात आले. ८० कोटी जनतेला मोफत अन्न धान्य देण्यात आले. गरीब कल्याण रोजगार अभियानात लाखो गरिबांना रोजगार देण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.                    यासोबतच पंतप्रधान जनधन योजना, अटल पेंशन योजना, संसद आदर्श ग्राम, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, आवास योजना, किसान सन्मान योजना, पंतप्रधान किसान सुरक्षा योजना तसेच महिलांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला महत्व देत उज्वल योजना याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून अधिकाधिक लोकांपर्यंत या योजना पोहचविण्याचे पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नरेंद्र पवार यांनी आवाहन केले.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पां रत्नपारखी यांनी केलं, विजय उपाध्याय भाजपा उत्तर भारतीया आघाडी कल्याण जिल्हा अध्यक्ष यांनी वर्ग गीत गायले, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी नरेंद्र पवार यांचा परिचय तर समारोप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला.

Post a Comment

0 Comments