Header AD

कोव्हिड-19 च्या काळातही लोकांनी अवयव दानासाठी पुढे येणे का महत्त्वाचे आहे?फोर्टिस हॉस्पिटलकल्याण येथील चीफ इन्टेन्सिव्हिस्ट डॉ. संदीप पाटील यांचा लेख..


◆जगभरात 6 दशलक्षहून अधिक व्यक्ती एखादा अवयव निकामी होण्याच्या अखेरच्या अवस्थेचा सामना करत असल्याचा अंदाज आहे. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लान्ट ऑर्गनायझेशन (NOTTO)च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 5 सुमारे 5 लाख लोकांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते. प्रत्यारोपणासाठी दाता उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागतात. देशामध्ये दररोज अवयवदात्याच्या प्रतीक्षेमध्ये 17 जणांचा मृत्यू होतो. देशभरात मृत्यूपश्चात अवयवदानाचे प्रमाण प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे अवघे 0.34 इतका आहेजे स्पेन (35.1) किंवा युनायटेड स्टेट्स (21.9) सारख्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत अजूनही खूपच कमी आहे.        देशातील एकूण 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी केवळ 13 राज्येच अवयवदानामध्ये योगदान देत असल्याने राज्याराज्यांमध्येही अवयवदानाच्या संख्येमध्ये तफावत दिसून येते. म्हणूनच भारतातील अवयवदानाचे प्रमाण जगभरात सर्वात कमी आहे. पॅनडेमिकमुळे हा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. प्रत्यारोपणाशी निगडित सेवा ही अनेक प्रकारच्या सेवांवर अवलंबून असते. कोव्हिड-19 च्या पहिल्या आणि दुस-या लाटेमध्ये या सर्व सेवा अत्यंत व्यस्त झाल्याने प्रत्यारोपण सेवेला त्याचा सर्वाधिक फटका बसला.आताकोव्हिड-19 च्या या काळामध्ये अवयवदानाचा हा उदात्त हेतू आपण कुठपर्यंत जपू शकतोअवयव प्राप्त करणा-या लोकसंख्येला तसेच आरोग्यकर्मींना संसर्गाचा धोका कमीत-कमी असावा यासाठी पद्धतशीरपणे विषाणूसंसर्गाची तपासणी करून घेणेसंरक्षणात्मक उपकरणांचा वापरसोशल डिस्टन्सिंग आणि फॉलो-अप्ससाठी टेलिकन्सल्टेशन यांसारख्या धोरणांचा वापर आधीपासूनच केला जात आहे. अनेक हॉस्पिटल्सनी आता आपल्या ट्रान्सप्लान्ट सेवा पुन्हा सुरू केल्या आहेतपण आता प्रत्यारोपणासाठी उपलब्ध दात्यांची संख्याच रोडावण्यासारखे नवे पेच सामोरे येत आहेतज्यामुळे या जीवनरक्षणासाठीच्या प्रयत्नांमध्ये व त्यांच्या परिणामांमध्ये अडथळा येत आहे.तेव्हा देशांतर्गत अवयवदानाची संख्या वाढविणे आणि शक्य तितके जीव वाचविणे ही आताची गरज आहे. त्यासाठी नागरिकआरोग्यकर्मी आणि या कामाला पाठबळ देणा-या विविध संघटनांनी जनजागृती करणे व अवयवदानाबद्दलच्या भ्रामक समजूतींचे उच्चाटन करण्यासाठी आणि त्याबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.अवयव निकामी झाल्याने प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांना सर्वसामान्य आयुष्य जगण्यासाठी सुयोग्य दात्याकडून अवयव प्राप्त होणे हा एकमेव मार्ग असतोकाही वेळा तर त्यांच्यासाठी तो जीवनमरणाचा प्रश्न असतो. एखादी व्यक्ती दोन प्रकारे अवयवदान करू शकते. लिव्हिंग डोनर अर्थात जिवंत दाता ही एक निरोगी व्यक्ती असतेजी आपल्या किडनीसारख्या अवयवांच्या जोडीपैकी एक अवयव किंवा यकृतासारख्या अवयवाचा भाग दान करते. डिझिज्ड डोनर अर्थात मृत दाता म्हणजे मृत्यूपश्चात (विशेषत्वाने ब्रेन डेथ) अवयवदान करणारी व्यक्ती. रस्ते अपघातामध्ये डोक्याला मार लागणे किंवा मेंदूमधील नस फाटल्याने मेंदूमध्ये मोठा रक्तस्त्राव होणे अशा कारणांमुळे मेंदूला विनाशकारीकायमस्वरूपीकधीही भरून न येणारी दुखापत होते व त्यामुळे ब्रेन डेथ अर्थात मस्तिष्कस्तंभ मृत्यू संभवतो. मेंदू हाच संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारे केंद्र असल्याने त्याचे काम सुरू असल्याशिवाय व्यक्ती जिवंत राहू शकत नाही व हळुहळू शरीरातील इतर सर्व अवयवसंस्था बंद पडू लागतात. विशिष्ट वैद्यकीय चाचणीद्वारे ब्रेन डेथचे निदान केले जाते व अशा मृत्यूला वैद्यकीय आणि कायदेशीरदृष्ट्या मृत्यूच मानले जाते. मृताच्या शोकमग्न कुटुंबियांचे समुपदेशन केले जाते व त्यांच्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करण्याचा पर्याय सांगितला जातो. एक दातासुद्धा सुमारे 6-9 रुग्णांना जीवनदान देऊ शकतो (दोन किडनीयकृतहृदयफुफ्फुसेपॅन्क्रियाजआतडीडोळे आणि उती).

  


          भारतामध्ये अवयवदानाचा पुरस्कार करण्यासाठी एका सध्या बहुअंगी दृष्टिकोनाची गरज आहे. अवयवदानासंबंधीचे कायदे अस्तित्त्वात असले तरीही त्यांची अंमलबजावणी अद्यापही अवयवदानाला प्रोत्साहन देणारी नाही. याबाबतीत पुढील गोष्टी करता येतील:


-     मृत घोषित करण्यासाठीच्या प्रक्रियेचे सुव्यवस्थापन

-     अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी एक मध्यवर्तीपारदर्शी ऑनलाइन प्रतीक्षा यादीची पद्धत तयार करण्याची गरज आहे

-     ब्रेन डेथविषयी जागरुकता वाढविणे आणि अधिकाधिक व्यक्तींनी अवयवदानाची संकल्पना स्वीकारावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे

-     NOTTO च्या ऑर्गन डोनेशन रजिस्ट्रीमध्ये नाव नोंदविण्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणेअवयवदानाचे प्रमाण खात्रीशीररित्या वाढविण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे डोनर रजिस्ट्री अर्थात दात्यांची नोंदणी. ही नोंदणी म्हणजे दाता बनण्याची इच्छा जाहीर करण्याचा एक मार्ग नव्हेतर अवयवउती आणि डोळ्यांसारखी शरीर भेट देण्याला दिलेली ती कायदेशीर संमती आहे. यासाठी तुम्हाला फक्त आपला होकार द्यावा लागतो. https://notto.gov.in/registration.htm येथे कधीही लॉगइन करून व तेथील फॉर्म भरून तुम्ही या नोंदणीसूचीचा भाग बनू शकता.अवयव निकामी झाल्याने प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या आणि दान केल्या जाणा-या अवयवांची संख्या यांत एक मोठी तफावत आहे. अनेक रुग्ण अवयवाच्या प्रतिक्षेत मृत्यू पावतात तर इतरांना जिवंत व्यक्तीकडून यकृत किंवा किडनी प्रत्यारोपण करावे लागते. भारतातील अवयवदानांची संख्या वाढून प्रती दशलक्ष एक अवयवदान एवढ्या पातळीवर जरी पोहोचली तरीही त्यातून अनेकांचे प्राण वाचतील. अवयवदान करण्याची शपथ घेण्याची प्रक्रिया अगदी साधी आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव दान करू इच्छिणा-या व्यक्तीला एक डोनर कार्ड दिले जाते. चलाअवयवदान दिवसाच्या निमित्ताने आपण आपले अवयव आपल्या मृत्यूपश्चात दान करण्याची प्रतिज्ञा करूया आणि आपला हा हेतू आपल्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना माहीत करून देऊ या.

कोव्हिड-19 च्या काळातही लोकांनी अवयव दानासाठी पुढे येणे का महत्त्वाचे आहे? कोव्हिड-19 च्या काळातही लोकांनी अवयव दानासाठी पुढे येणे का महत्त्वाचे आहे? Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads