शिवसेना धावली जनतेच्या मदतीला..

    

 


पुर परिस्थितीत झालेल्या घाणीच्या साम्राज्या मुळे समर्थ नगर विभागात स्वच्छता मोहीम...


 

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात जागोजागी चिखलमाती बरोबर घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. परंतु पूर्वेकडील नांदीवली समर्थ विभागात खड्डेमय रस्ते आणि गटारे यांची समस्या असून आता साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्या समस्येतून नागरिकांची सोडवणूक करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला असून नांदीवली येथे साठणाऱ्या पाण्यावर त्वरित उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

       नंदिवली येथील स्वच्छता मोहिमेच्यावेळी डोंबिवली शिवसेनाशहरप्रमुख राजेश मोरेतालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रेराजेश कदमशाखाप्रमुख उमेश पाटील, सागर जेधे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्वामी समर्थ मठ नांदीवली डोंबिवली पूर्व येथे २ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पाणी साठण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. सदर समस्येबाबत तक्रार खासदार शिंदे यांना स्थानिक नागरिकांनी केली होती. 
      त्यानुसार कल्याण लोकसभा खासदार डॉ. शिंदे यांच्या निर्देशानुसार शनिवारी सकाळी  ९ पासून शिवसेना मध्यवर्ती शाखा आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या देखरेखेखालीमहापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने समर्थनगर ठिकाणी ५० सफाई कामगार२ जेसीबीसक्शन मशीन  याच्या साहाय्याने गाळ काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी काम सुरू झाले. 
         ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबले जाते. तिथे गटारे तोडून नवीन चेंबर तयार करण्याचे व अरुंद नाले रुंद करण्याचे तातडीचे काम सुरू आहे.या विभागातील विकास कामे महापालिकेचा निधी कमतरतेमुळे अनेक दिवस कामे खोळंबली आहेत. ती पायाभूत कामे पावसाळ्यानंतर पूर्ण होणार असून आजच्या परिस्थितीत घाणीचे साम्राज्य दूर करून येथील नागरिकांना रोगराईचा त्रास होऊ नये म्हणून तात्पुरती कार्यवाही खासदार डॉ.शिंदे यांच्या निर्देशानुसार होत असल्याचे शिवसैनिक राजेश कदम यांनी सांगितले.
         या स्वच्छता मोहीम कामासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. कामगार समर्थनगर विभागात स्वच्छता करीत असून नालेगटारे आणि परिसराची साफसफाई करीत आहेत.स्वच्छता मोहिमेमुळे नागरिक समाधानी असून केलेल्या कारवाईबाबत धन्यता मानत आहेत.

Post a Comment

0 Comments