आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी तरी साधना करा - सद्गुरु नंदकुमार जाधव

       

■विश्‍व भरातील जिज्ञासूंसाठी  ११ भाषां मध्ये ऑनलाईन गुरु पौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न...कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे;  म्हणून आपण बँकेत पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.          यापूर्वी आनंद प्राप्तीसाठी साधना कराअसे आम्ही सांगत होतोमात्र येणारा आपत्काळ इतका भीषण असणार आहे कीआता जिवंत राहण्यासाठी साधना कराअशी वेळ आली आहेअसे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन करत होते.            यंदा 11 भाषांमध्ये ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाले. या महोत्सवांचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि श्री गुरुपूजन यांद्वारे झला. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. तसेच परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांनी यापूर्वी केलेल्या मार्गदर्शनांची संग्रहित ध्वनीचित्रफित आणि आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता’ या विषयावरील ध्वनीचित्रफितही दाखवण्यात आली.          स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता सांगणारी प्रात्यक्षिके (बचाव आणि आक्रमण) या महोत्सवाचे आकर्षण ठरले. सनातन संस्थेचे संकेतस्थळतसेच हिंदुजागृती’ हे संकेतस्थळ आणि यू-ट्यूब चॅनेल यांद्वारे या कार्यक्रमाचा लाभ ९०  हजारांहून अधिक जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला.

Post a Comment

0 Comments