सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षा रोपण

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या सुमारास या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना आल्हाददायक वातावरण मिळावे या उद्देशाने या क्रीडा संकुलामध्ये गुलमोहराच्या विविध जातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आल्याची माहिती डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. भाजपतर्फे श्याम प्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिवस ते पुण्यतिथी कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. त्याच अनुषंगाने डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात गुलमोहराची ५६ झाडे लावण्यात आली.गुलमोहराच्या झाडांमुळे या परिसरात सावली निर्माण होईल. ही झाडे टिकावी म्हणून याठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. मैदानात टाकण्यात आलेल्या डब्रिजमुळे या मैदानाची दुरवस्था झाली आहे ती दूर करण्याच्या दृष्टीने लवकरच मातीचा थर टाकण्यात येणार असून मैदान सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.यावेळी कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीभाजप आमदार रविंद्र चव्हाणजिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेमहिला मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्षा रेखा चौधरीडॉ. सुनीता पाटीलनिलेश म्हात्रेमंदार हळबेमुकुंद पेडणेकरनितीन पाटीलसंदीप पुराणिकमिहिर देसाईनिलेश पेडणेकरनंदू जोशीप्रदीप चौधरीजितेंद्र पाटीलनंदू परबमहिला पदाधिकारी वर्षा परमारपूनम पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments