डॉ.जितेंद्र निसाळ आणि डॉ.सुहासिनी बडेकर यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र ...
डोंबिवली , शंकर जाधव  :  कोरोना महामारीत डोंबिवली पश्चिम येथील अपेक्स हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र  निसाळ आणि डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या  शास्त्रीनगर रुग्णालय येथील डॉक्टर सुहासिनी बडेकर  यांनी  रुग्णांना आधार देऊन दवा उपचार केल्याबाबत तसेच योग्य ते सल्ले देऊन रुग्णांचे प्राण वाचविले. 


           याची दखल  घेऊन एडवोकेट प्रदीप बावस्कर आणि ज्येष्ठ समाजसेविका काशीबाई जाधव आणि दक्षता समितीवरील थामहिला सदस्य यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून डॉक्टरांनाच गुरु मानून  डॉक्टर निसाळ (अपेक्स हॉस्पिटल )  आणि सुहासिनी बडेकर डॉक्टर यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन गुरुवंदना केली.

Post a Comment

0 Comments