ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नवनाथ रणखांबे सन्मानित


जीवन संघर्ष पुस्तकावर विश्व विक्रमाची ऐतिहासिक  मोहर...

  
डोंबिवली  ( शंकर जाधव )  कवी लेखक नवनाथ रणखांबे लिखित  शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले  "जीवन संघर्ष"  पुस्तक, हे त्यांचे पहिलेच पुस्तक असून ते तुफान गाजले आहे.  मराठी साहित्य क्षेत्रात जीवन संघर्ष पुस्तकावर परिक्षणे, आभिप्राय, समीक्षा कमीत कमी  वेळेत जास्तीत जास्त  समीक्षक ,  साहित्यातील जाणकार ,  सुज्ञ वाचक वर्गांनी केली असून  ती दर्जेदार दैनिक,  वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक इ. प्रकाशित झाले आहे.   जीवन संघर्ष पुस्तकावरील १७७ परिक्षणांची नोंद  ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड २०२१ मध्ये  झाली आहे.  


   
         मराठी साहित्य क्षेत्रात एक अनोखे  ऐतिहासिक  विश्व रेकॉर्ड  निर्माण झाले आहे. डॉ. दिनेश गुप्ता ( सईओ   आणि चिफ एडिटर  ओ एम जी  बुक ऑफ रेकॉर्ड )  यांच्या हस्ते जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांना ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड २०२१ ने कल्याणमध्ये  सन्मानित करण्यात आले आहे.
'जीवन संघर्ष'  पुस्तकाचा समावेश  विश्वविक्रमात  झाल्यामुळे नवनाथ रणखांबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे.           समीक्षक, सुज्ञ वाचक आणि साहित्यातील जाणकार साहित्यिक कलाकृतीचे परिक्षण करतात. 'जीवन संघर्ष' या पुस्तकावर  वाचक वर्गाने  चांगला प्रतिसाद  दिला. कमी वेळेत जास्तीत जास्त  पुस्तकावर लिहिले गेले आणि ते मिडियात प्रकाशित झाले. आज पर्यत  परिक्षणांचा  कोणाचाही  ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड झाला नाही तो 'जीवन संघर्ष' या पुस्तकाने केला याचा मला फार आनंद होत आहे.           ज्या ज्या कवी , साहित्यिकांनी , आणि वाचक वर्गानी  पुस्तकावर अभिप्राय,  समीक्षा, परिक्षणे लिहिली. पुस्तकाला मदत करणाऱ्या आणि परिक्षणे प्रसिद्ध करणाऱ्या प्रसारमाध्यमांना हा ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सन्मान मी कृतज्ञता पूर्वक अर्पण करतो असे यावेळी नवनाथ रणखांबे  बोलतांना  व्यक्त झाले.

Post a Comment

0 Comments