गणेश भामरे सरांनी समर्पित भावनेने काम केले- नरेंद्र पवार
कल्याण, कुणाल  म्हात्रे  : शिक्षणक्षेत्रासोबतच संघाचा एक स्वयंसेवक म्हणून गणेश भामरे सरांनी समर्पित भावनेने काम करून अनेक विद्यार्थी घडविले असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिर मधील डॉ आनंदीबाई जोशी सभागृहात गणेश भामरे सरांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.  
          यावेळी छत्रपती शिक्षण मंडळाचे संस्थेचे उपाध्यक्ष ना.क.फडकेकार्याध्यक्ष तरटे कार्यकारिणी सदस्य डॉ कांगणेअभिनव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संपत गीते,  भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारेशिक्षण क्रांती संघटनेचे कल्याण डोंबिवली विभाग अध्यक्ष गजानन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.वनवासी आश्रमहिंदू सेवा संघ यासोबतच  छत्रपती शिक्षण मंडळाच्या विविध समित्यांवर गणेश भामरे यांनी काम केले त्यामध्ये परीक्षा समितीमध्ये त्यांनी प्रभावीपणे काम केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संस्थेने  आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये गणेश भामरे यांचा सहभाग असे.
विशेषतः विविध शासन निर्णयरोष्टर वर त्यांचा अभ्यास होता. त्यांच्या या अभ्यासामुळे अनेक शिक्षक-शिक्षकेतरांना न्याय मिळाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ना.क. फडके व शाळेचे मुख्याध्यापक संपत गीते यांनी गणेश भामरे सरांच्या गौरवपर भाषणे झाली.

Post a Comment

0 Comments