दृष्टी वेलफेयर असोसिएशनची टीम पोहचली पूरग्रस्तांच्या मदतीला
कल्याण , कुणाल  म्हात्रे : अतिवृष्टीने वाताहात झालेल्या कोकणातील रत्नागिरीच्या चिपळूण भागात डोंबिवली येथील दृष्टी वेलफेयर असोसिएशनची टीम आपली मदत घेऊन पोहचली आणि तेथील लोकांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. दृष्टी वेलफेयर असोसिएशनच्या टीमने चिपळूण येथे २६ जुलै रोजी  पूरग्रस्त असलेल्या ५०० कुटुंबांपर्यंत संपर्क साधला होता आणि  त्यानुसार मदतीसाठी आवाहन केल्यानंतर अनेक स्तरांतून मदतीचा मदतीचा  हात मिळाल्यानंतर  असोसिएशनने त्यांना मूलभूत गरजा देऊन मदत केली.या मदतीबरोबरच  येत्या आठवड्यात ते स्थानिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना टेलि-कॉलिंग आणि व्हिडिओ मुलाखतीद्वारे संपर्क साधणार आहेत. "महिला सक्षमीकरणावर प्रामुख्याने काम करणार्‍या द्रुष्टी वेलफेयर असोसिएशनने या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची आणि त्यांना या काळात अन्न आणि मूलभूत जीवनासाठी मदत करुन त्यांच्याशी लढा देण्यास मदत करण्याची योजना आखली आहे.  आम्ही चिपळूणकरांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करीत आहोत आणि या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संस्थेच्या संचालिका सोनाली लाड यांनी सांगितले.या मदत कार्यात सागर पवारसिद्धेश परबराहुल गायकवाडविशाल मानेजयेंद्र राजेशिर्केप्रथमेश कांबळेसचिन कानसेप्रकाश पाटीलसनी मस्तूदसागर रायपुरेनिखिल घागशशिकांत वाजे, संगमेश्वर तालुका सांगवे गावचे सरपंच  देवदत्त शेलारप्रणय शेलार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments