७४विद्यार्थ्यांना प्रल्हाद म्हात्रे यांनी घेतले शैक्षणिक दृष्ट्या वर्षभरा साठी दत्तक


■महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेला १ लाख १२ हजारांची दिली देणगी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर संघटक तथा समाजसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील ७४ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन सामाजिक जाणीवेचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे शाळेतील अनेक पालकांचे रोजगार गेले आहेत. बरेच पालक राहत्या घराचे भाडे देणे परवडत नसल्याने गावाकडे विस्थापित झाले आहेत. जे पालक डोंबिवली मध्ये मिळेल तो रोजगार स्विकारुन तग धरून आहेतअशा पालकांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये आपल्या पाल्याचे शालेय शुल्क देणे शक्य होत नाही. या अनुषंगाने रेल चाईल्ड प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक संजय चौधरीमहात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक अंकुर आहेरशाळेतील जेष्ठ शिक्षक चंद्रकांत देठे तसेच शाळेचे हितचिंतक पालक सुनिल भोसले या सर्वांनी पालकांची व्यथा प्रल्हाद म्हात्रे यांना सांगितली.प्रल्हाद म्हात्रे हे महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी शाळेतील सद्यपरिस्थिती विषयी मुख्याध्यापकांनी चर्चा केली. ते स्वतः उच्च विद्याविभूषित असल्यानेशैक्षणिक प्रगतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी काय करता येईलहे त्यांनी सुचविले. महात्मा गांधी विद्यामंदिर शाळा व विद्यार्थ्यांवरील प्रेमापोटी इयत्ता ५ वी ते १० वी मधीलशैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ७४ विद्यार्थ्यांना एका वर्षांकरिता दत्तक घेण्याचे प्रल्हाद म्हात्रे यांनी घोषित केले. त्या ७४ विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क १ लाख १२ हजार चा धनादेश मुख्याध्यापक अंकुर आहेर व शिक्षकांच्या हाती त्यांनी सुपूर्द  केला. इतकी मोठी रक्कम देवून पालकांना सहकार्याचा हात देणेही शाळेच्या अनुषंगाने अत्यंत गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे. रेल चाईल्ड संस्था व महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकहे प्रल्हाद म्हात्रे यांचे ऋण कधीही विसरू शकत नाहीअशी प्रतिक्रिया मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. प्रल्हाद म्हात्रे यांचा हा आदर्श शाळेतील इतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी  ठेवावाअसे मत शाळा समिती अध्यक्ष उल्हास झोपे यांनी व्यक्त केले. सध्या शिक्षणाचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत टिकवून ठेवणे आवश्यक आहेमाध्यमिक शाळेबरोबरच रेल चाईल्ड प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काच्या रुपाने शाळेचे माजी विद्यार्थी सहकार्य करतील असा आशावाद प्रल्हाद म्हात्रे यांनी व्यक्त केला.प्रल्हाद म्हात्रे यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क रुपाने दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दलरेल चाईल्ड संस्था अध्यक्ष दत्तात्रय गोडबोलेकार्यवाह भगवान सुरवाडेकोषाध्यक्ष विवेक द्याहाडरायमहात्मा गांधी विद्यामंदिर शाळा समिती अध्यक्ष उल्हास झोपेमुख्याध्यापक अंकुर आहेर आणि रेल चाईल्ड प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष गिरीश जोशीमुख्याध्यापिका संध्या जैन यांनी प्रल्हाद म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments