प्रोडिजी फायनान्सची मोठी कामगिरी

 मुंबई २६ जुलै २०२१: प्रोडिजी फायनान्स या पोस्टग्रॅज्युएट इंटरनॅशनल विद्यार्थ्यांसाठी क्रॉस-बॉर्डर कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या पहिल्याच फिनटेक कंपनीने सामाजिक प्रभाव आणि सीमाविहीन शिक्षणाबद्दलची कटिबद्धता दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने इंडस्ट्रीत प्रथमच तीन महत्त्वाच्या सुविधा देण्याची घोषणा केली आहे.     प्रोडिजी फायनान्सने प्रामुख्याने, प्रथमच सिक्युरिटायझेशन समर्थित इन्व्हेस्टमेंट-ग्रेड १ स्टुडंट लोन अॅसेट जारी केले आहे. एबीएसला ३०४ दशलक्ष डॉलर्स पोर्टफोलिओचा पाठींबा असलेले कर्ज २०१७ पासून प्रोडिजी फायनान्सने जागतिक शीर्षस्थ विद्यापीठे आणि बिझनेस स्कूलमध्ये शिकणाऱ्या पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना दिले आहेत.         एकूण २८८ दशलक्ष डॉलर्सपैकी २२७ दशलक्षांचा मोठा वाटा मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेसने Aa३ मधील क्लास ए रेटिंग दिले आहे. तसेच क्रोल बाँड रेटिंग एजन्सीकडून A+ मिळाले आहे. लाँच झाल्यापासून त्याची किंमत एलआय बीओआर+१२५ बीपी होती. उर्वरीत तीन रेट केलेले कर्जाचे वाटे हे प्रमुख जागतिक मालमत्ता व्यपस्थापकासह आधीच निर्धारीत केले आहेत.         प्रोडिजीच्या अग्रगण्य सोशल बाँड फ्रेमवर्कअंतर्गत २८८ दशलक्ष डॉलरचे वितरण आणि सुरुवातीचा सोशल बाँड पहिल्यांदाच जारी केला जाईल. याद्वारे फिक्स इन्कम मार्केटमध्ये हा कर्जदाता दुहेरी पदार्पण करेल. शिक्षण तसेच सामाजिक-आर्थिक प्रगती तसेच सबलीकरणावर भर देत प्रोडिजी फायनान्सने आयसीएमए सोशल बाँड प्रिन्सिपल्स २०२१ आणि यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससोबत भागीदारी केली आहे.            त्याला गोल ४ क्वालिटी एज्युकेशन आणि गोल १० रिड्यस्ड इनइक्वॅलिटी असे म्हटले गेले. आयएसएस या स्वतंत्र थर्ड पार्टीकडून सेकंड पार्टी ओपिनिअनमार्फत ही भागीदारी आणि यश निश्चित केले गेले. जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांसाठी हे महत्त्वपूर्ण आणि समर्पक धोरण बनत आहे.      या महत्त्वपूर्ण घोषणेनंतर, प्रोडिजी फायनान्सने कर्जाच्या अर्जांमध्ये वार्षिक स्तरावर ५० टक्के वृद्धी अनुभवली. हे अर्ज एमबीए आणि इंजिनिअरिंग मास्टर्सह ग्रॅज्युएशनचा अभ्यास करणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांकडून आले. कंपनीने पोर्टफोलिओची कामगिरीही वाढवली. बिझनेस, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये वाढ झाल्याने उच्च शिक्षित पोस्टग्रॅज्युएट कर्जदारांची संख्याही वाढली.          प्रोडिजी फायनान्सने सोशल बाँड जारी केल्याने उच्च शिक्षण बाजारपेठ कशा प्रकारे सामान्य होत आहे, हे दिसून येते. तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या भविष्याबाबत कंपनीचा आत्मविश्वासही स्पष्ट होतो.प्रोडिजी फायनान्सचे सीईओ कॅमरॉन स्टिवन्स म्हणाले, “ आपल्या कर्जदारांना पारंपरिक सावकारांकडून योग्य सुविधा मिळत नाही. त्यांना कोलॅटरल, सह स्वाक्षरीकर्ता आणि कर्जाच्या इतिहासाची गरज असते. कर्जदाराच्या भविष्यातील संभाव्य उत्पन्नावर प्रोडिजी फायनान्स कर्ज पुरवण्याची क्षमता राखते.याद्वारे विद्यार्थ्यांना वित्त सहाय्य मिळते. पर्यायाने त्यांना जगात सर्वोच्च क्रमांकाच्या शाळांमध्ये शिक्षण मिळते.”

Post a Comment

0 Comments