अंगारकी चतुर्थी निमित्त टिटवाळा गणपती मंदिर गाभाऱ्यात फुलांची आरास व विद्युत रोषणाई


मंदिर लवकरात लवकर उघडावे भाविकांचे बाप्पाला पार्थना...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : अंगारकी चतुर्थी निमित्त टिटवाळा महा गणपती मंदिर गाभाऱ्यात फुलांची सजावट व मंदिरावर विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे मंदिराला अतिशय सुंदर शोभा आली आहे.            अंगारकी चतुर्थी म्हंटली की गणेश भक्तांसाठी पर्वणीचा दिवस. परंतु सध्या मंदिरे बंद असल्याने बाप्पाचे दर्शन होत नसल्याने भाविकांत नाराजी दिसून येते आहे. बाप्पाला पहाण्यासाठी सर्वच गणेश भक्त असं लावून आहेत. लवकरात लवकर मंदिर उघडे व्हावे अशा प्रकारचे साकडे अनेक भाविक-भक्तानी गणेशाला घातले असावे.               मंगळवारी आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त टिटवाळा येथील महागणपती मंदिर गाभाऱ्यात हजारो जरबेरा, गुलाब व ऑरकीड या फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसर व मंदिरावर करण्यात आलेली विद्युत दिव्यांची रोषणाई यामुळे मंदिराला चांगलीच शोभा आली आहे.               मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून मंदिर विश्वस्तांनी निर्णय घेऊन भाविकांना मंदिर परीसरात येता येणार नाही. अशा प्रकारचे आवाहनात्मक पत्रक काढले होते. यामुळे भाविकांना अंगारकी चतुर्थीला बाप्पाचे मुखदर्शन देखील होऊ शकले नाही.          
              परंतु भाविकांना बाप्पाचे लाईव्ह दर्शन व्हावे यासाठी मंदिर परिसरात असणाऱ्या पार्किंग मध्ये एल ऐडी स्क्री लावण्यात आली आहे. पहाटे पाच वाजता नियमानुसार बाप्पाची महाआरती झाली.

Post a Comment

0 Comments