ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले असून कल्याण तालुक्यातील बापसई आणि आपटी येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. कल्याण नजीक असलेल्या बापसई येथील नारायण टेंभे यांचा मुलगा हार्दिक टेंभे याला  ९७ टक्के मिळाले असून निर्मल इंग्लिश स्कूल गोवेली या शाळेत त्याचा प्रथम क्रमांक आला आहे.           तर आपटी येथील भास्कर शिसवे यांचा मुलगा आर्यन शिसवे याला ९४ टक्के मिळाले असून निर्मल इंग्लिश स्कूल गोवेली या शाळेत त्याचा तिसरा क्रमांक आला आहे. ग्रामीण भागात राहून देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Post a Comment

0 Comments