कोरोना समुप देशन समितीच्या शिबिरात ५३ जणांचे रक्तदान
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना समुपदेशन समितीच्या विदयमाने  कल्याण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी नारायण हॉल येथे झालेल्या या रक्तदान शिबिरात ५३ जणांनी रक्तदान करून जीवनदात्याची भूमिका पार पाडली. यात पाच पती पत्नींनी देखिल सहभाग नोंदवला.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश ठक्कर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि  भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सदस्या रक्षंदा सोनवणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरूवात करण्यात आली. रक्तदान केल्याने जीवनदान मिळत असल्याने नागरिकांनी मोठया संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन रक्षंदा सोनवणे यांनी केले. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश ठक्कर यांनी कोरोनाच्या संकटकाळात रक्तदान शिबिरासोबतच गरिबांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम देखिल राबवणे आवश्यक असल्याचे सांगून आपण स्वतः दररोज रेल्वे स्टेशन परिसरात अन्नदान करत असल्याचे स्पष्ट केले.रक्तदान शिबिरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जोशी यांनी देखिल हजेरी लावली. कोरोना समुपदेशन समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून समितीने हजारो  कोरोना रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत केली असल्याचे सांगून सप्टेंबर ते आजपर्यंत अशा दहा महिन्यात सामाजिक बांधिलकी म्हणून  सहा रक्तदान शिबिरे यशस्वीरित्या आयोजित करून शेकडो रूग्णांना जीवनदान देण्याचे कर्तव्य बजावले आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर क्षेत्रात देखिल  काम करता यावे म्हणून  वेगळया नावाने संघटनेची नोंदणी करणार असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यात सहभागी करणार असल्याचे अनिल काकडे यांनी सांगितले.                रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष अनिल काकडे,  सचिन ताम्हणकरएकनाथ जाधवप्रथमेश पुण्यार्थीमहेश भोईरविनायक शेणवी,  धनंजय तायडे, विनय ताटकेरोहन गवळेसईद अत्तरअजीज चौधरी,  संगिता मोरेशकुंतला रायभारती वाढेवैशाली वाघनयना नायरसायली शेजवळसुषमा सहस्त्रबुद्धेकरूणा कातखडे,  तृप्ती दोडवालचैताली जाधवद्वारका सोनोनेसरिता मोतीराळेसीमा सुरळकरप्रिया जोशीशलाका पाटीलछाया शिंदेजयश्री सातपुते,  छाया  लिखारमंगला आरोटे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments