फक्त सत्कारा पुरतीच कल्याणात उरली काँग्रेस कल्याण शहर जिल्हा कॉंग्रेसने केला पालिका आयुक्तांचा सत्कार

 

■काँग्रेस कार्यकर्ते महापालिका निवडणुका जवळ आल्याने झाले सक्रिय....कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महापालिका निवडणुका जवळ आल्याने कल्याण जिल्हा काँग्रेस सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्ष कल्याण जिल्ह्यात जिवंत झाल्याचे दिसून येत असले तरी तो फक्त सत्कार करण्या पुरताच जिवंत असल्याचे चित्र दिसून आले आहे. १२२ नगरसेवक संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत काँग्रेसचे फक्त ४ नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आले होते.सोमवारी कल्याण जिल्हा काँग्रेसचे शिष्टमंडळ महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यास आले होते. कोविड काळात दिसून न आलेले काँग्रेस कार्यकर्ते मात्र महापालिका आयुक्तांचा सत्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे फक्त सत्कारा पुरतीच काँग्रेस कल्याण जिल्ह्यात उरली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे आयुक्तांचा अनेक पक्ष संघटना यांनी सत्कार केला होता.आता कल्याण जिल्हयात विशेष क्रियाशील नसलेली काँग्रेस सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले.कल्याण डोंबिवली महानगरपालिका भ्रष्टचार, भ्रष्ट अधिकारी, रस्त्यांची दुरावस्था अश्या अनेक कारणांनी महापालिकेचे नाव मालिन झाले होते. परंतु डॉ सूर्यवंशी यांनी कल्यांणकरांची मान उंचावलेली आहे. यामुळे कल्याण जिल्हा काँग्रेस तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. तसेच बऱ्याच वर्षापासून रेंगाळत असलेला विषय रोड मध्ये ज्यांची घरे गेली आहेत  अश्या बाधित लोकांसाठी घरे, बीएसयूपी बाधित लोकांसाठी घरे, तसेच कचोरे आणि मोहने येथे मुस्लिमांसाठी दफनभूमी अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.यावेळी ब्रिजकिशोर दत्त, महिला जिल्हाध्यक्षा  कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, जितू भोईर, मनीष देसले, विमल ठक्कर, मुन्ना तिवारी, भुपेश सिंग, लालचंद तिवारी, युसुफ मेमन, सलीम शेख, जलील मणियार, लता जाधव, वैशाली वाघ, लिओ मेक्कनराय, हेमराज डेरेपाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments