कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त भागांचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची शिवसेनेची मागणी


■कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांचे तहसीलदारांना दिले निवेदन..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : १७ ते २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व मधील खडेगोळवलीवालधुनीअशोक नगरशिवाजी नगरनेहरू नगर, आनंदवाडीसाई नगरकैलास नगर या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून सर्व पूरग्रस्त विभागातील नागरिकांना आर्थिक व सर्वोतोपरी मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.              याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांनी  तहसीलदारांना निवेदन दिले असून यावेळी माजी नगरसेवक रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, महेश गायकवाड, महादेव रायभोळे, जयवंत भोईर, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, राधिका गुप्ते, आशा रसाळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.१७ ते २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व मधील खडेगोळवलीवालधुनीअशोक नगरशिवाजी नगरनेहरू नगर, आनंदवाडीसाई नगर, कैलास नगर या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या चाळी मध्ये पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांच्या घरातील बहुतांश सामान अन्न धान्यइलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत.  या विभागातील राहणारे सर्व नागरिक हे गरीब व मध्यमवर्गीय असून मोल- मजुरी व नोकरी धंदा करणारे असून या कोरोना च्या काळामध्ये अनेक नागरिक बेरोजगार आहेत. त्या मध्ये आलेल्या या नेसर्गिक आपत्ती मुळे त्यांची पूर्ण वाताहत झाली आहे.या सर्व नागरिकांना कोणताही आधार नसल्यामुळे या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून या पूर ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करून आधार देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. 


Post a Comment

0 Comments