महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त नवी मुंबई महापालिकेच्या कोव्हीड रुग्णालयात व्हेंटिलेटर व बिपअप मशीनचे वाटप- खासदार राजन विचारे
ठाणे,  प्रतिनिधी  :  -  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढल्याने रुग्णालयात अपुऱ्या यंत्रसामुग्री मुळे अनेक रुग्णांचे हाल होत होते. या कोरोना महामारीच्या काळात तिसऱ्या लाटेची संभावना वाटत असल्याने याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्जीबिशन सेंटर येथील कोव्हीड रुग्णालयात ४ व्हेंटिलेटर व बिपअप मशीनचे वाटप आज उपनेते, चेअरमन – मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ मा. श्री. विजय नाहटा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.          या प्रसंगी शिवसेना नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, मा. स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, रोहिदास पाटील, मिलिंद सूर्यराव, शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे तसेच मा. नगरसेवक आकाश मढवी, राजू कांबळे, , महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त 1 सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.             तसेच अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी कोविड -१९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना राज्यपाल मा. श्री भगतसिंगजी कोश्यारी यांनी कोविड संजीवनी हा पुरस्कार दिल्याबद्दल खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजीत बांगर व अतिरिक्त आयुक्त 1 सुजाता ढोले, यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments