पार्ले अॅग्रो 'स्‍मूद'सह भारतीय दुग्‍धक्षेत्राला नवीन आकार देण्‍यास सज्‍ज


■नवीन व नाविन्‍यपूर्ण उत्‍पादन ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून भारतीय दुग्‍धक्षेत्राला नवीन आकार देणार...


 ■ग्राहकांमधील दोन जागतिक स्‍तरावरील लोकप्रिय फ्लेवर्स – ''चॉकलेट मिल्‍क व टॉफी कॅरेमलमध्‍ये फ्लेवर्ड मिल्‍क श्रेणी स्‍मूद सादर''


राष्‍ट्रीय, २५ जुलै, २०२१ : तीन दशकांहून अधिक काळापासून प्रख्‍यात भारतीय पेयांसह देशातील फळांवर आधारित पेये विभागामध्‍ये अग्रणी असलेल्‍या पार्ले अॅग्रो या भारताच्‍या मल्‍टी-कॅटेगरी, मल्‍टी-ब्रॅण्‍ड पेयांच्या अग्रणी कंपनीने डेअरी कॅटेगरीमधील त्‍यांच्‍या विवीधकरणाची घोषणा केली आहे. 


           या परिवर्तनाला प्रबळ दुग्‍ध पायाभूत सुविधा निर्माण करण्‍यासाठी आणि भारतीय ग्राहकांकरिता सर्वोत्तम उत्‍पादने सादर करण्‍यासाठी अनेक वर्षांचे सखोल संशोधन आणि आधुनिक व नवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञानांमधील व्‍यापक गुंतवणूकींचे पाठबळ आहे. यासह पार्ले अॅग्रो यापूर्वी विभागामध्‍ये न दिसण्‍यात आलेल्या नाविन्‍यपूर्ण व नवीन ग्राहक अनुभवांसह भारतातील दुग्‍धक्षेत्रामध्‍ये गतीशीलपणे परिवर्तन घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे.


           पार्ले अॅग्रो दुग्‍ध उत्‍पादनांची उच्‍च दर्जायुक्‍त व प्रिमिअम श्रेणी – 'स्‍मूद'सह दुग्‍ध विभागामध्‍ये प्रवेश करत आहे. कंपनीच्‍या तत्त्वाला कायम राखत 'स्‍मूद' हे जागतिक स्‍तरावरील बाजारपेठेमध्‍ये एकमेव चवदार दूध पेय आहे, जे ८५ मिली टेट्रा पॅक कार्टन्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल आणि त्‍यांची किंमत फक्‍त १० रूपये आहे. या ऑफरिंगसह पार्ले अॅग्रो आगामी चार वर्षांमध्‍ये सध्‍याच्‍या ८०० कोटी रूपयांवरून ५००० कोटी रूपयांपर्यंत महसूल नेत भारतातील ब्रॅण्‍डेड फ्लेवर्ड मिल्‍क बाजारपेठ विकसित करण्‍याची तयारी करत आहे.


          स्‍मूद' हे सिल्‍की, पौष्टिक व स्‍वादिष्‍ट चवदार दूध पेय ग्राहकांमधील दोन जागतिक स्‍तरावरील लोकप्रिय फ्लेवर्स –चॉकलेट मिल्‍क व टॉफी कॅरेमलमध्‍ये उपलब्‍ध आहे. सर्वोत्तम दर्जाचे साहित्‍य व दूधातील पौष्टिकतेच्‍या संयोजनासह तयार करण्‍यात आलेले हे पेय निश्चितच सर्व वयोगटातील ग्राहकांचे नवीन आवडते पेय बनेल.


              स्‍मूद' हे १० रूपये किंमत असलेला फ्लेवर्ड मिल्‍क विभागामधील एकमेव ब्रॅण्‍ड आहे. यामधून पार्ले अॅग्रोला किंमतीसंदर्भातील मर्यादा दूर करण्‍याची संधी मिळते. किंमतीमुळे भारतातील फ्लेवर्ड मिल्‍क विभागाच्‍या विकासामध्‍ये अडथळा निर्माण झाला आहे. किंमत व पॅकचा आकार देखील पार्ले अॅग्रोला 'स्‍मूद'साठी उच्‍च पोहोच व वितरण संपादित करण्‍यामध्‍ये साह्य करतात.


          स्‍मूद' १० रूपयांच्‍या चॉकलेटशी समरूप असलेले जलद एनर्जी बूस्‍ट किंवा जलद गोड पेयाचा शोध घेणा-या ग्राहकांच्‍या गरजांची देखील पूर्तता करते. म्‍हणूनच चॉकलेट मिल्‍क पेयासाठी अद्वितीय व वैविध्‍यपूर्ण पॅक आकार आणि किंमतीसह 'स्‍मूद' निश्चितच फ्लेवर्ड मिल्‍क विभागासोबत १० रूपये चॉकलेट विभागामध्‍ये देखील अनुकूल परिणाम घडवून आणेलं.

Post a Comment

0 Comments