कल्याण डोंबिवलीत ८० नवे रुग्ण तर एक मृत्यू १३५ रुग्णांना डिस्चार्ज





कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ८० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.


आजच्या या ८० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार २९९ झाली आहे. यामध्ये ९०७  रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३५ हजार १४९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



आजच्या ८० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – २६डोंबिवली पूर्व  ३२, डोंबिवली पश्चिम – १५ तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments