नगरसेवक विकास रेपाळे आपले तीन महिन्यांचे मानधन पूरग्रस्तांना देणार


■पूरग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून माझे तीन महिन्यांचे मानधन वर्ग करावे अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे...


ठाणे,  प्रतिनिधी  ;  महाराष्ट्रातील अनेक जिल्हयामध्ये महाप्रलयकारी पर्जन्यवृष्टी झाली आहे, यामध्ये प्रामुख्याने महाड तळीये येथे दरड कोसळून अंदाजे ३२ घरे बाधित होवून यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वच क्षेत्रातून या गंभीर परिस्थितीला हातभार लावण्यासाठी मदत केली जात आहे.           या अनुषंगाने मी माझे तीन महिन्यांचे मानधन सदर कामासाठी देवू इच्छित आहे.तरी माझे तीन महिन्याचे मानधन संबंधितांकडे वर्ग करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करणेस संबंधितांस आदेश व्हावेत अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.            नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले जाधव यांनी आपल्या वतीने या आधीच दोन ट्रक मदत कोकणवासीयांना पाठवली आहे.परंतु आलेले महापुराचे संकट हे मोठे असल्याने इतवरच न थांबता नगरसेवक विकास रेपाळे यांनी आपल्या तीन महिन्यांचे मानधन पूरग्रस्तांना देण्याची तयारी दर्शवली असून तसे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments