पाणी साचलेल्या वसाहतीं मध्ये तातडीने जंतुनाशक औषध फवारणी करा महापौर प्रतिभा पाटील यांचे प्रशासनाला आदेश
भिवंडी, प्रतिनिधी  : महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आज शहरातील सर्व प्रमुख पूरग्रस्त भागाची पाहणी केली शहरातील सखल भागांमध्ये ज्या भागात पाणी साचले होते असे संगम पाडा, म्हाडा कॉलनी, महापालिका शाळा, कोंबडपाडा, अजय नगर, शिवाजी चौक, आदर्श पार्क, नजराना कंपाउंड शिवाजी नगर भाजी मार्केट, भावे कंपाउंड, इत्यादी ठिकाणी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.           या वेळेला पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, मुख्यालय उपायुक्त मुख्यालय योगेश गोडसे, आपत्कालीन विभाग प्रमुख सुनील भोईर यांच्या समवेत उपस्थित होते. महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये तातडीने जंतुनाशक औषध फवारणी करण्याचे आदेश प्रशासनास दिले.  
             पुराचे पाणी साचलेल्या असलेल्या परिसरात तातडीने साफसफाई करून, या परिसरात जंतुनाशक, डासअळी नाशक दुर्गंधीनाशक फवारणी करण्यात यावी अशा सूचना महापौर या प्रतिभा विलास पाटील यांनी सर्व संबंधितांना दिल्या.  तसेच उर्वरित सर्व भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होताच साफसफाई करण्यात यावी व औषध फवारणी करण्यात यावी.             पावसाचे पाणी साचलेल्या  भागातील पावसाळी संसर्गजन्य साथीचे आजार उद्भवू शकतात,ही बाब लक्षात घेऊन त्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय पथके तैनात करून नागरिकांच्या आरोग्याची आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी प्रशासनास केल्या  आहेत.         तसेच पूरग्रस्त स्थलांतरित नागरिकांच्या करिता जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असे आदेश महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी सर्व संबंधित विभागाला दिले आहेत.

Post a Comment

0 Comments