ज्येष्ठ शिवसैनिक महिला सत्यभामा थेटे यांचे दुःखद निधन
डोंबिवली  ( शंकर जाधव ) हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा तसेच सेनेची कुठलीही  सभा असो ज्येष्ठ शिवसैनिक श्रीमती सत्यभामा थेटे (थेटे मावशी) आवर्जून उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांची तसेच उध्दव ठाकरेंची भेट घेतल्याशिवाय व्यासपीठाजवळून हलायच्या नाहीत अशा ज्येष्ठ शिवसैनिक श्रीमती सत्यभामा थेटे (88) यांचे नुकतेच वार्धक्याने दुःखद निधन झाले.           दसरा मेळाव्यास जाताना स्टेशन परिसरात "शिवसेना जिंदाबाद!, आवाज कुणाचा शिवसेनेचा` अशा घोषणा देत त्या सहभागी व्हायच्या. ज्या काळात शिवसेनेच्या महिला आघाडीची स्थापनासुद्धा झाली नसेल त्या काळात त्या शिवसेना डोंबिवली शाखेत उपस्थित रहायच्या. भाजी विक्री करून त्या उदरनिर्वाह करीत होत्या. आंदोलनात, मोर्चात त्या प्रचंड आक्रमक व्हायच्या.            त्यामुळे अनेक विरोधक, अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा दरारा होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता. त्यांच्या जाण्याने सेनेच्या एका आक्रमक स्वभावाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या गेल्याचं दुःख आहे. थेटे परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व शिवसैनिक सहभागी आहोत. स्व. थेटे मावशी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना अशी आदरांजली शिवसैनिकांनी दिली

Post a Comment

0 Comments