अडचणीच्या काळात निकम कुटुंबीयांनी माणुसकीपणा दाखवला याचा सार्थ अभिमान


आमदार रोहित पवार यांच्याकडून शेखर निकम यांच्यासह कुटूंबिय, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक...


चिपळूण (प्रतिनिधी)  :  चिपळुणातील परिस्थिती भयानक आहे या परिस्थितीत आमदार शेखर निकम यांनी माणुसकी जपली आहे पूरग्रस्तांची सेवा करीत असताना कोणतीही बॅनरबाजी केली नाही अथवा सोशल मिडियाचा वापर केलेला नाही. मनापासून प्रामाणिकपणे पूरग्रस्तांच्या अडचणी सोडवत आहेत. मी सुद्धा कार्यकर्ता आहे. तेसुद्धा याठिकाणी कार्यकर्ते आहेत  मला त्यांच्या या कार्याचा अभिमान आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी शेखर निकम यांचे भरभरून कौतुक केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आपल्याला अभिमान असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


 

         महापुरामुळे चिपळूण वासियांचे अतोनात नुकसान झाले आहे  या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार मंगळवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांचे मन हेलावले. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, चिपळुणातील पूर परिस्थिती भयानक आहे. या महापुरामुळे चिपळूणवासियांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर अन्य जिल्ह्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.              याचा अंदाज घेऊन घरे, अथवा दुकानदारांना कशी मदत करावी. याबाबत  कॅबिनेटच्या बैठकीत लवकरच सकारात्मक चर्चा होऊन पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा दोन दिवसात केली जाईल, असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर चे पुण्यातील पूर परिस्थिती आणि पूर ओसरल्यानंतर आमदार शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या योगदानाबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले. याबाबत ते म्हणाले की, महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे.          प्रशासनाला योग्य निर्देश देणे. यानंतर पूर ओसरल्या नंतर पूरग्रस्तांना पाणी बॉटल्स तसेच टँकरने पाणीपुरवठा करणे फुड पॅकेट्सचा पुरवठा करणे.  यासह पूरग्रस्तांच्या काही अडचणी असतील त्या सोडण्यावर आमदार शेखर निकम यांनी भर देत माणुसकीपणा जपला आहे. पूरग्रस्तांची सेवा करत असताना कोणतीही बॅनरबाजी केली नाही. अथवा सोशल मीडियाचा वापर केला नाही  मनापासून प्रामाणिकपणे पूरग्रस्तांच्या अडचणी सोडवत आहेत.              या त्यांच्या कार्याचा आपल्याला अभिमान आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते लोकांमध्ये राहून काम करीत आहेत त्यामुळे या सर्वांचे देखील कौतुक आहे एकंदरीत अडचणीच्या काळात निकम कुटुंबीयांनी माणुसकी पणा जपून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे असे आ. रोहित पवार यांनी यावेळी निकम कुटुंबियांचे देखील भरभरून कौतुक केले.


राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरीव मदत-शेखर निकम


पूर ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांना भरीव मदत करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गाव-घरनिहाय मदत वाटपाचं नियोजन सुरू आहे आणि ही मदत न भूतो न भविष्यती असेल असे यावेळी सांगितले.             तसेच या महापुरामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला पाच टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात तर या कर्जातील दोन ते तीन टक्के व्याज शासनाकडून भरण्यासंदर्भात व कर्जाला हप्त्याला एक वर्षाची मुदत मिळण्यासंदर्भात आपली चर्चा झाली आहे. यावर देखील सकारात्मक निर्णय झाला असल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले.            एकंदरीत पूरग्रस्त व्यापारी असो, अथवा नागरिक असो या सर्वांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असे आणि शेखर निकम यांनी यावेळी स्पष्ट केले.  या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments