रिब्रँडिंगच्या प्रक्रियेत लक्षात ठेवण्यासारखे ७ टप्पे
■कंपनीच्या उद्दिष्टात मोठा बदल करावयाचा असल्यास, एखादी मोठी घटना घडल्यास तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्यास अथवा कंपनीला नव्या ग्राहकवर्गाला आकर्षित करायचे असल्यास तसेच वेगवेगळे उद्दिष्ट असलेल्या दोन संस्थांचे विलीनीकरण झाल्यास कॉर्पोरेट युनिट स्वत:चे रिब्रँडिंग करतात. रिब्रँडिंगचे कारण योग्य असेल तर या प्रक्रियेचे परिणाम चांगले मिळतात. उदाहरणार्थ, कंपनीला ज्या व्यक्तीसमोर स्वत:चे चित्र उभे करायचे आहे, ते कंपनीचे सध्याचे नाव, लोगो, टॅगलाइन किंवा एकंदरीत मार्केटिंग कम्युनिकेशन घटकांद्वारे साध्य होत नसेल तर ती रिब्रँडिंगची वेळ आहे. यशस्वी रिब्रँडिंगच्या वाटेवर घेऊन जाणा-या ७ महत्वपूर्ण टप्प्यांबद्दल सांगताहेत एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी.१.  आत्मपरिक्षण करा: ब्रँडची सध्याची स्थिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. हे केले नाही तर पुढील प्रवास इप्सित ध्येयापर्यंत पोहोचवत नाही. पैसा, वेळ आणि जोखिमीच्या बाबतीत रिब्रँडिंग एक महागडी प्रक्रिया आहे. या मार्गावर आत्मपरिक्षण करणे खूप आवश्यक आहे. ब्रँडने पुढील प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत:  • ब्रँड काय आहे?
  • याचा अर्थ काय आहे?
  • ब्रँड काय करतो?
  • ब्रँडचे रिब्रँडिंग करण्याची गरज काय आहे?
  • हवे असलेले अंतिम परिणाम निश्चित करणेही महत्त्वाचे आहे, कारण त्यानुसार
  • रोडमॅप आखता येऊ शकतील.


२. बाजार संशोधन: ब्रँडिंग किंवा रिब्रँडिंग प्रक्रिया नेहमीच ग्राहकावर लक्ष केंद्रित करून केली जाते. त्यामुळेच रिब्रँडिंगपूर्वी संपूर्ण साखळीत सर्वात महत्त्वाचा हितकारक म्हणजेच ग्राहकाशी संवाद साधणे प्रभावी ठरते. त्यांच्यावर तुमचा काय प्रभाव आहे, त्यांच्या मनात ब्रँडविषयी चांगली मते, वाईट मते आणि ब्रँडकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे खूप आवश्यक आहे. सध्या त्यांच्या मनात ब्रँडचे काय स्थान आहे, हे यातून कळेल. याद्वारे तुम्हाला पुढील मार्ग निश्चित करता येईल.


३. अद्वितीयतेची ओळख: ब्रँड यूएसपी नेहमीच रिब्रँडिंगच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणारा हवा. उदा. तुम्ही एक प्रीमियम ब्रँड आहात, तर एका रिब्रँडिंग प्रक्रियेतून तुम्ही आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकता. ब्रँडला एक युनिव्हर्सल सोल्युशन बनवण्याचा प्रयत्न करु नये. याउलट त्याच्या ताकतींवर कायम राहिले पाहिजे. ब्रँडच्या ताकदीच्या आधारेच रिब्रँडिंग केले पाहिजे आणि ही ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


४. ब्रँडच्या टचपॉइंट्सची यादी तयार करा: बहुतांश ब्रँड, विशेषत: लहान किंवा नवे ब्रँड हे लोगोलाच ब्रँड मानतात. मात्र लोगोपेक्षाही जास्त ब्रँड ही संकल्पना मोठी आहे. लोगो हा निश्चितच महत्त्वाचा घटक आहे, पण पॅकेजिंग, वेबसाइट, सोशल मीडिया पेज, बिझनेस स्टेशनरी यासारखी इतर टचपॉइंट्स आहेत. उदा. काया स्किन क्लिनिकसारख्या सर्व्हिस ब्रँड प्रकरणात क्लिनिक या शब्दातूनच अनेक ब्रँड टच पॉइंट्स तयार होऊ शकतात. क्लिनिकमध्ये रिसेप्शन डेस्क, स्टाफचा गणवेश, क्लिनिकच्या भिंती इत्यादी ब्रँड टच पॉइंट्स ठरतात.५. सर्व स्टेकहोल्डर्सला आपल्यासोबत ठेवणे: रिब्रँडिंग प्रक्रियेदरम्यान सर्व स्टेकहोल्डर्स, विशेषत: कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेशी जोडणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांना रिब्रँडिंगची गरज किंवा प्रक्रियेच्या परिणामांविषयी साशंकता असेल तर सगळे प्रयत्न अपयशी ठरू शकतात. त्यामुळे त्यांना रिब्रँडिंगच्या आवश्यकतेविषयी जागरूक केले पाहिजे. एवढेच नव्हे तर नवी ओळख आणि टच पॉइंट्समधील बदलांविषयी प्रशिक्षित किंवा जागरूकदेखील केले पाहिजे.


६. लोकांसमोर ब्रँडचा खुलासा: तुम्ही रिब्रँडिंगविषयी घटक तयार केल्यानंतर लवकरात लवकर ते जनतेसमोर सादर करा. ही प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने नव्हे तर एकदाच झाली पाहिजे. लोकांना बदल आवडत नाही, पण हळूवार होणाऱ्या बदलांचाही ते तिरस्कार करतात! रिब्रँडिंग लोकांसमोर घेऊन जाण्यापूर्वी आपल्या स्टेकहोल्डर्समध्ये टीझर कम्युनिकेशनद्वारे उत्सुकता जागवली पाहिजे. स्टेकहोल्डर्सना रिब्रँडिंगची प्रक्रिया सर्वप्रथम का केली आहे, हे सांगणे आवश्यक आहे. तसेच या प्रक्रियेद्वारे त्यांचा काय फायदा होणार, हेही सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


७. फीडबॅक संकलित करावा लागेल: जहाज मार्गाला लागल्यानंतर म्हणजेच रिब्रँडिंग प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही त्यावर स्टेकहोल्डर्सच्या प्रतिक्रिया घेणे महत्त्वाचे आहे. प्रक्रियेचा प्रभाव पाहणे आणि तिचे काय परिणाम झालेत, तसेच आणखी काय सुधारणा हव्यात, हे यातून कळेल. रिब्रँडिंग हा ब्रँडचा पुनर्जन्मासारखा असतो. या प्रक्रियेत पुर्वायुष्यातील उणीवा दूर करत आणखी चांगला, मजबूत आणि नवा ब्रँड तयार होण्याची संधी या दृष्टीने पाहायला हवे. लक्षात ठेवा, तुमचा ब्रँडच स्पर्धकांपासून तुम्हाला वेगळा ठरवतो. तसेच आपल्या ग्राहकांशी नाते जोडण्यास मदत करतो. ज्या गोष्टी योग्य नाहीत, त्यात सुधारणा करण्याची संधी रिब्रँडिंगद्वारे मिळते. त्यामुळे गोष्टी सुधारा आणि त्याचा लाभ मिळ‌वा.

Post a Comment

0 Comments