शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांची पूरग्रस्तांना मदत


डोंबिवली ( शंकर जाधव )    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती चा फटका बसला असल्याने आपत्ती ग्रस्तांना भरघोस मदतीचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत  डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत  ज्येष्ठ नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी  खाद्यतेल या पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहे.            रमेश म्हात्रे यांचे चिरंजीव माजी विभाग प्रमुख मनोज रमेश म्हात्रे यांनी हि मदत सुपुर्द केली. यावेळी  शिवसेना पदाधिकारी  किशोर मानकामे ,सुधीर पाटील, संतोष चव्हाण, मंगला सुळे, वैशाली दरेकर, कविता गावंड, शेखर खेडेकर आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना मध्यवर्ती शाखेत मुख्यमंत्र्यांच्या  आवाहनाला  प्रतिसाद देत अनेक नगरसेवकांनी डोंबिवली विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत.          वैशाली दरेकर म्हणाल्या कि, स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्काराचे प्रतिबिंब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात दिसत आहे. वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन हे त्यांच्या मनातील मोठेपण आहे डोंबिवली शाखेतून सुमारे अडीच हजार पूरग्रस्तांना मदत देण्यात येत आहे.तर यावेळी मनोज म्हात्रे म्हणाले, राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. 
           या जलप्रलयाच्‍या थैमानामुळे विशेषत: कोकणातील महाड, चिपळूण, खेड तर पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उध्‍वस्‍त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजून या पुरग्रस्‍तांसाठी मदत देणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments