टिटवाळ्यातील रुक्मिणी प्लाझा हॉस्पिटल मध्ये सामान्य रुग्णसेवा सुरू करा

 

■शिवसेना कल्याण तालुका ग्राहक सरंक्षण कक्ष प्रमुख विजय देशेकर यांची मागणी ....      

                             

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टिटवाळा पूर्व येथील रूक्मिणी प्लाझा हॉस्पिटलात ओपीडी रूग सुविधा तसेच प्राथमिक उपचार सुविधा सुरू करण्याबाबत शिवसेना कल्याण तालुका ग्राहक सरंक्षण कक्ष प्रमुख विजय देशेकर यांनी क.डो.मपा आयुक्तांना साकडे घातले आहे.          टिटवाळा पूर्वेत महापालिकेच्या वतीने नागरीकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता एक सुसज्ज असे रुक्मिणी प्लाझा हॉस्पिटल नव्याने उभारले असुन त्यात सद्यस्थितीत कोविड रुग्णांसाठी रुग्णालय सुरु होते. पण आता कोविड रुग्ण संख्या कमी झाली असल्याने प्रशासनाने ते हॉस्पिटल १ जुलै २०२१ पासुन बंद केले आहे.            मांडा टिटवाळा परीसरातील लोकसंख्या लक्षात घेता त्वरीत तिथे सर्व नागरीकांसाठी सामान्य रुग्णालय सुरु करण्यात यावा, यात दैनंदिन  ओपीडी तसेच रुग्णांसाठी प्राथमिक उपचार सुविधा त्वरीत उपलब्ध करावी जेणेकरून परीसरातील नागरीकांना एक चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण होइल.            अशा आशायाचे निवेदन  टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजय देशेकर यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments