पुरात अडकलेल्या २०० हुन अधिक नागरिकांची अग्निशमन दलाने केली सुटका

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   बुधवारी रात्री पासून पडत आलेल्या धुंवाधार पावसामुळे गुरुवारी सकाळी पासून कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात पावसाचे पाणी जागोजागी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे काही ठिकठिकाणच्या उंच सखल भागातीळ चाळी इमारती मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या पुराच्या पाण्यात अडकलेल्या विविध ठिकाणच्या सुमारे दोनशेहुन अधिक नागरिकांची पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जावानांनी सही सलामत सुटका करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.           गेल्या तीन दिवसांपासून कल्याण डोंबिवली शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी रात्री अधिकच जोर धरत झोपडपून काढल्याने रात्री पासूनच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरु लागल्याने त्याची चांगलीच तारंबळ उडाली होती. गुरुवारी पहाटे पासूनच पुराचे पाणी अधिकाच वाढू लागल्याने सकाळी पालिका क्षेत्रातील खाडी नजीक असलेल्या भागात तसेच सखल भागातील चाळी इमारती मध्ये पाणी शिरू लागल्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी पालिकेच्या  अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटेच्या सुमारास धाव घेत पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.कल्याण पश्चिमेतील सापर्डेजगबुडी नगर येथून १५  नागरिकांनाभवानी नगर- अनुपम नगर-अंबिका नगर येथून २० नागरिकांना,  कल्याण पूर्वेतून ५ नागरिकांनागोविंदवाडी परिसरातून तब्बल ११० तर डोंबिवली पश्चिमेतून ४७  नागरिकांना अशा सुमारे दोनशे हुन अधिक नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.


Post a Comment

0 Comments