भाडेकरू लोकांना शासनाने सरंक्षण आणि दिलासा देण्याची राष्ट्रवादीची मागणी


■राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांचे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्र्यांना पत्र..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना आणि लॉकडाउन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भाडेकरू लोकांना शासनाने सरंक्षण आणि दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.राज्यात कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेक लोकांचे काम धंदे बंद पडले असुन त्यांना कुटुंबियांचे पोट भरणे ही अवघड झाले आहे. यामध्ये बरेचसे असे लोक आहेत जे भाड्याने राहतातकाही लोकांचे व्यवसाय करत असलेले जागा भाड्याची आहे.  कोरोना आणि लॉकडाउन मुळे बरेचसे लोकांच्या काम धंद्यावर मोठा परिणाम झाल्याने ते आपले घर मालकाला वेळेवर घर भाडे न देऊ शकल्याने घर मालक घर खाली करून देण्यासाठी तगादा करत आहेत.अशा कठीण परिस्थितीत एक सामान्य गरीब परिवाराला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ नये म्हणून राज्य सरकारने अशा घर मालकांवर व जागा मालकांवर काही बंधने घालणे गरजेचे आहे.  जेणेकरून राज्यातील बरेचसे जिल्ह्यांमध्ये सामान्य गरीब जनतेला या कोरोना आणि लॉकडाउन च्या काळात भाड्यासाठी तगादा करणारे घर मालकाकडून काही प्रमाणात दिलासा मिळेल.या विषयाची दखल घेऊन भाडेकरू लोकांना शासनाने सरंक्षण आणि दिलासा देण्याची मागणी नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


Post a Comment

0 Comments