डॉक्टर बाबासाहेबांनी नम्रपणे ज्ञान आत्मसात केले म्हणून इतिहास घडला - कविता सरदार (विद्यार्थी समुपदेशक)

 
■सम्राट अशोक विद्यालयात ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी...

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित  सम्राट अशोक विद्यालयात ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रमुख मान्यवर म्हणून विद्यार्थी समुपदेशक कविता सरदार उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या  म्हणाल्या, जीवनात गुरु फार महत्त्वाचा आहे. अडचणींना सामोरे जाण्यासाठी गुरु ज्ञान आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी नम्रपणे ज्ञान आत्मसात केले. 


अनेक पुस्तकातून गुरुरूपी ज्ञानाचे  आकलन केले.  विद्यार्थ्यांनी नम्रपणे ज्ञानात वाढ करावी पुस्तकांचे वाचन करून गुणवत्ता वाढवावी. आई-वडील हे आपले प्रथम गुरू आहेत. त्यांना आपल्यामुळे त्रास होईल असे वागू नका असेही त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी नवे कपडे घालून घरूनच कार्यक्रमाचा आनंद घेतला. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी प्रस्तावना केली तर सहशिक्षक गणेश पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments