शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण निःशुल्क द्या भाजप शिक्षक आघाडीची मागणी




कल्याण , कुणाल  म्हात्रे :  शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचा शासन निर्णय काढला परंतू प्रशिक्षण हे सशुल्क असून प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या तारखांना मात्र अजून मुहूर्त मिळाला नाही. यावर भाजप शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजिका डॉ कल्पना पांडे, पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकरप्रदेश सह संयोजक विकास पाटीलकोकण विभाग संयोजक एन. एम. भामरे यांनी प्रशिक्षण निःशुल्क द्यावे व प्रशिक्षणाच्या तारखा घोषित कराव्यात यासाठी मुख्यमंत्रीशिक्षणमंत्रीशिक्षण सचिव  व संचालक यांना निवेदन पाठविले आहे.


राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी आवश्यक सेवांतर्गत प्रशिक्षण शासनाने सन २०१५ पासून आयोजित केले नसल्याने हजारो शिक्षक वेतनश्रेणी मिळण्यापासून वंचित आहेत. आता शासनाने वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी दहा दिवसाचे आनलाईन प्रशिक्षण घेण्यास मंजूरी दिली असून प्रशिक्षण आयोजित करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडे सोपवली आहे. 



शासनाने सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित न केल्यामुळे वेतनश्रेणी मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांना दहा दिवसांचे आनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वेतनश्रेणीच्या पात्रतेच्या दिनांकापासून म्हणजे १२ किंवा २४ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या दिनांकापासून वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.  परंतु सेवांतर्गत प्रशिक्षण नोंदणीसाठी शिक्षकांकडून शूल्क वसूल करण्याचे शासनाने ठरविले आहेही बाब अन्यायकारक नियमबाह्य व प्रचलित तरतुदींशी विसंगत आहे.



आजपर्यंत जेवढे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले ते सर्व निःशुल्क होते. परंतु आता शिक्षकांकडून प्रशिक्षणासाठी शूल्क वसूल करणे योग्य नाही, सशुल्क प्रशिक्षणाच्या अन्यायकारक निर्णयामुळे शिक्षकांमध्ये  शासनाप्रत्ती प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.  शासनाने वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या बाबतीत बरेच शासन निर्णय निर्गमित केले परंतू अजून प्रशिक्षणाच्या तारखा जाहीर केल्या नाही त्यामुळे प्रशिक्षणाच्या तारखांसाठी आणखी किती तारखा उलटतील ?असा सवाल पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर यांनी शासनाला केला आहे.



प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या तारखा जाहीर करून प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करावी जेणकरून त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखिल त्याचा लाभ होईल व पुन्हा ऑक्टोंबर नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्याची वेळ शासनावर  येणार नाही. तसेच शासनाने सर्व पात्र शिक्षकांना निःशुल्क सेवांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करुन द्यावे अशी  मागणी भाजपा शिक्षक आघाडीने केली असल्याची माहिती कल्याण जिल्हा संयोजक विनोद शेलकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments