उंबर्डे घनकचरा प्रकल्पाला नागरिकांचा विरोध सुरूच


■कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा....कल्याण , कुणाल  म्हात्रे  : उंबर्डे घनकचरा प्रकल्पास स्थानिकांचा प्रचंड विरोध सुरूच असून आज काही स्थानिक नागरीकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारला. दुर्गंधी आणि भणभणणाऱ्या माशांमुळे गावकरी त्रस्त आहेत. आम्ही गाव सोडून जावं का असे लिखित द्यानाही तर ही समस्या सोडवा. अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरीकांनी पोलिसांसमोर दिला आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेने आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद केले आहे. हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आल्याने आत्ता शहरातील गोळा करण्यात आलेला कचरा उंबर्डे प्रकल्पाच्या ठिकाणी प्रक्रियेसाठी टाकला जात आहे. हा प्रकल्प  खाजगी कंत्रटदाराला देण्यात आला आहे. त्याठिकाणी कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. त्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने कचऱ्याच्या दुर्गंधीचा आणि कचऱ्यामुळे माशा घोंघावत आहेत त्याचा त्रास नागरीकांना होत आहे. हा कचरा प्रकल्प सुरु करण्यापूर्वी हा प्रकल्प बंदिस्त असावा असावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र हा कचरा प्रकल्प बंदीस्त नाही.शहरातील सगळा कचरा याच ठिकाणी टाकला जाऊ नये. डोंबिवली आणि कल्याण शहरात दोन स्वतंत्र कचरा प्रकल्प असावेत. उंबर्डे येथे केवळ क आणि ब प्रभागातील कचरा टाकला जावा अशी स्थानिकांची मागणी आहे. आज स्थानकि नागरीक चिंतामणी लोखंडे यांच्या नेतृत्वात काही नागरीक प्रकल्पाच्या ठिकाणी गेले. त्याठिकाणी पोलिसही पोहचले. नागरीकांनी प्रकल्प चालविणाऱ्या खाजगी व्यक्तिला जाब विचारला. आम्ही गाव सोडून जाऊ का असा संतप्त सवाल पोलिसांसमोर विचारला.या प्रकल्पावर १७ गाड्यांना कचरा टाकण्याची परवानगी असतांना याठिकाणी तब्बत २००  गाड्या कचरा टाकण्यात येतो. येणाऱ्या काळात लवकरात लवकर ही समस्या सुटली नाही तर गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे आता केडीएमसीत कचरा प्रश्न पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments