कल्याण डोंबिवलीत १०२ नवे रुग्ण तर ३ मृत्यू ९२ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रा आज १०२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.



आजच्या या १०२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ४८८   झाली आहे. यामध्ये ८७६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३५ हजार ३६६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 




आजच्या १०२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – ३०डोंबिवली पूर्व  ३७, डोंबिवली पश्चिम – २२, मांडा टिटवाळा – २,  तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

 

Post a Comment

0 Comments