पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्या नंतर आली पालिकेला जाग....


फसवणूक टाळण्यासाठी घर खरेदी दारांना संपर्क साधण्याचे पालिकेचे आवाहन..


डोंबिवली  ( शंकर जाधव )  महापालिका परिक्षेत्रात पुरपरिस्थितीत अनेकांचे संसार उध्वस्त झाले. ज्या चाळीत घरे खरेदी केली होती ती अनधिकृत असल्याचे आरोप होत आहेत. याबाबत पालिका आता जागी झाली असून नागरिकांनी घर घेताना फसवणूक होऊ नये काळजी घ्या अशी जागरूकता दाखवत आहे. कल्याण डोंबिवलीत महापालिका क्षेत्रात घर खरेदी करीत असताना कायदेशीर बाबींची योग्य तपासणी करूनच घर खरेदी करावे. 


         वर्तमान पत्रातील आकर्षक जाहिरातींना भुलून न जाता हेल्पलाईन, दूरध्वनीवरून महापालिकेकडूनच सदनिका किंवा दुकान खरेदी करावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी केले आहे.अश्या प्रकारचे फलक ठिकठिकाणी पालिकेच्या वतीने लावण्यात येणार आहे.        अनेक नागरिक महापालिका क्षेत्रात कोणत्याही कायदेशीर बाबीचा तपासणी न करता अनधिकृत चाळीत, इमारतीमध्ये नागरीक घरे, सदनिका खरेदी करतात. अशा इमारती, चाळी यावर महानगरपालिके तर्फे चाळी/ इमारती तोडून/निष्कासन करण्याची कायदेशिर कारवाई झाल्यामुळे नागरीकांचे मोठे आर्थिक नुकसान होते व फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते.           नागरीकांची फसवणूक होऊ नये म्हणून व नागरीकांना उचित मंजूरी प्राप्त बांधकामामध्ये मालमत्तेची खरेदी करता यावी या दृष्टीने व महापालिका क्षेत्रात कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांमधील फ्लॅट, घरे, बंगला इत्यादी खरेदी करतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत नागरीकांना जाहीर आवाहन केले आहे.  महापालिका क्षेत्रात घरे किंवा वाणिज्य वापराचे दुकान व इतर प्रयोजनासाठीची बांधीव मालमत्ता समुचित नियोजन प्राधिकरणाच्या मंजूरीच्या कागदपत्राची  खातरजमा केल्याशिवाय खरेदी करू नये.          नागरीकांना अनधिकृत बांधकाम संबंधा बाबत तक्रारी करण्याकरीता टोल फ्री क्रमांक
१८००-२३३-४३९२ उपलब्ध करून दिला आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रात घर घेऊ इच्छिनान्या नागरीकांना बांधकामाच्या अधिकृततेबाबत चौकशी करण्याकरीता टोल फ्री क्रमांक १८००-२३३-७२९५ देखील कार्यान्वित करण्यात आला असून बहुमजली आर.सी.सी.बांधकामाच्या संदर्भात समुचित नियोजन प्राधिकरण यांचेकडून प्रदान केलेल्या बांधकाम परवानगी विषयी खात्री करूनच खरेदी विक्रीचे व्यवहार करावेत.         काही बांधकाम व्यवसायीक, एजंट, दलाल यांच्या वर्तमान पत्रातील जाहिरातीला भुलून न जाता हेल्पलाईनला दुरध्वनी करून महापालिकेकडून खात्री करूनच सदनिका, दुकान खरेदी करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आता केले असून त्याबाबतचे प्रसिद्धी पत्रकही काढल्याने शहरात हा चर्चिला जात आहे. पुरामुळे संसार उध्वस्त झाल्यावर असे पत्रक काढून आयुक्तांनी पुढे फसगत होणाऱ्याना जागे केले आहे.

Post a Comment

0 Comments