ओरिफ्लेमने 'द वन लिप स्पा लिप बाम' लॉन्च केले नव्या ड्युएल-कोअर तंत्रज्ञानानेयुक्त उत्पादन
मुंबई २६ जुलै २०२१ : ओरिप्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्विडिश ब्युटी ब्रँड, आजच्या महिलांच्या गरजा ओळखणाऱ्या उत्पादनांवर विश्वास ठेवतो. ब्रँडने नुकतेच आपल्या द वन ब्रँड अंतर्गत अत्याधुनिक ड्युएल-कोअर तंत्रज्ञानयुक्त 'लिप स्पा लिप बाम' हे उत्पादन आणले आहे. आजच्या स्त्रिया, ज्यांना आयुष्यातून आणि त्यांच्या मेकअपमधून आणखी काही हवे असते, त्यांच्यासाठी द वन हा अत्याधुनिक ब्रँड आहे.         द वन लिप स्पा लिप बाम, ज्या महिलांना दिवसभर ओठ सुंदर दिसणे आणि त्यांच्या सुंदरतेचा अनुभव घ्यायचा असेल, अशांसाठी सुपरचार्ज्ड स्पा ट्रीटमेंट देतो. स्लीक, स्लिमलाइन पॅकेजिंग आणि युनिक ड्युएल कोअर टेक्नोलॉजी असलेला नवा लिप बाम ओलावा टिकवून ठेवणे, गोलाकार देणे आणि सुरक्षित ठेवणे, असे तीन प्रकारचे लाभ मिळवून देतो.       द वन लिप स्पा लिप बाम अंतर्गत मरीन अल्गी एक्स्ट्रॅक्ट असून तो सलग आठ तास ओलावा धरून ठेवतो. या व्हॉल्युमिंग पेप्टाइडदेखील आहे, जे आपल्या ओठांचे संरक्षण करते. कोलॅजन वाढवते आणि हायलोरॉनिक अॅसिड गोलाकार देते. अधिक व्हॉल्युम असलेले ओठ आणि एसपीएफ १५ व्हिटॅमिन ई ओठांना कवच देते. बाहेरील आवरणाद्वारे निरोगी, नैसर्गिक ग्लोसाठी प्रत्येक त्वचेच्या टोनला अनुरुप रंगाचा एक स्पष्ट संकेत प्रदान केला जातो. त्यामुळे आपण दिवसभर सर्वोत्तम हास्य ठेवू शकतो.

Post a Comment

0 Comments