कल्याणचे खासदार कोकणातील आपत्ती ग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पोहचले थेट गावां गावात■डॉ. श्रीकांत  शिंदेनी दिली कोकणातील महाडखेडचिपळूण आदी विविध पूरग्रस्त भागांना भेट /अन्न धान्यचादरीचटईकपडेभांडीशेगडीपिण्याचे पाणी यांसोबत इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप डोंबिवली शहरशाखा तसेच शहरप्रमुख राजेश मोरे यांनी घेतला मदतीचा पुढाकारकल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी थेट गावांगावात पोहचले असून त्यांनी कोकणातील महाडखेडचिपळूण आदी विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी अन्नधान्यचादरीचटईकपडेभांडीशेगडीपिण्याचे पाणी यांसोबत इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. डोंबिवली शहरशाखा तसेच शहरप्रमुख राजेश मोरे यांनी मदतीचा पुढाकार घेतला आहे.गेल्या आठवड्याभरात विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे कोकणातील महाड शहर आणि बाजारपेठेत १३ फुटापर्यंत पाणी साचल्याने तेथील गावांतील घरामधले अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले मोठे हाल झाले होते. 
त्यासाठी कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृवाखाली शिवसेना डोंबिवली शहर शाखा आणि शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या पुढाकाराने कोकणातील पूरग्रस्त महाडखेडचिपळूण आदी भागातील नागरिकांच्या मदत सेवेकरिता अन्नधान्यचादरीचटईकपडेभांडीशेगडीपिण्याचे पाणी यांसोबत जीवनावश्यक वस्तूंनी भरगच्च भरलेले एकूण १६ ट्रक आणि १ एसटी महामंडळाची बस दि. ३० जुलै रोजी झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेत्याचबरोबर ३१ जुलै रोजी स्वतः प्रत्यक्ष जाऊन महाडखेडचिपळूण आदी भागातील विविध गावांतील पूरग्रस्त भागाचा दौरा करत तेथील नागरिकांची भेट घेत मदतीचा हात दिला.पूराचे पाणी ओसरल्यावर पूरग्रस्त भागात वाहून आलेला कचरागाळघाण जमा होणे आणि यामुळे विषाणूंचा प्रसार होऊन साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन तातडीने शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री आणी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकानवी मुंबई महानगरपालिकापनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी आणि टीडीआरएफ जवानांच्या मदतीने कोकणातील महाड शहर स्वच्छ आणि निर्जंतूकीकरणाचे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सह अन्य स्थानिक प्रशासनासह महाड येथील विविध पूरग्रस्त भागांना भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहरात सुरु स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर महाड येथील कोठेश्वरी तळेप्रभात कॉलनी येथील पूरग्रस्त बांधवांकरिता आणलेले अन्नधान्यचादरीचटईकपडेभांडीशेगडीपिण्याचे पाणी यांसोबत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने पूरग्रस्त बांधवांकरिता आरोग्य शिबीर सुरु असून या शिबिराला भेट देत तेथील डॉक्टरांशी संवाद साधत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात आरोग्य तपासणी करुन घेण्याचेआवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी केले. या मोफत आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी नंतर रुग्णांना लागणारी औषधे मोफत दिली जात आहेत.

Post a Comment

0 Comments