अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डोंबिवली शाखेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला सर्व स्थरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डोंबिवली शाखेनेहि मदतीचा हात पुढे केला आहे.         डोंबिवली शाखेत शहर मंत्री अलोक तिवारी , शहर सहमंत्री दीपक शर्मा, महाविद्यालय प्रमुख हरिओम  शर्मा, व्यवस्थाप्रमुख तुषार निमकर, विद्यार्थिनी प्रमुख साक्षी इंगळे, विद्यार्थिनी सहप्रमुख श्रावणी मोहरील यांसह कुहू पटवर्धन, प्रथम माधवपुरकर, कार्तिक खंदारे, अलिशा गावडे, अदिती मेस्त्री आदि कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आलेले समान, धन्य व कपडे जमा करण्याचे काम करत आहेत.शक्य झाल्यास नागरिकांनी पूरग्रस्तांना मदर करा असे आवाहन  शहर सहमंत्री दीपक शर्मा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments