अजगराच्या तीन पिल्लांना सर्पमित्राने दिले जीवनदान

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण ग्रामीण चौरे गाव परिसरातील  फार्महाऊसमध्ये तीन अजगराची पिले शनिवारी आढळल्याने उपस्थितांची भांबोरी उडाली. या तीन पिल्लांना सर्प मित्रांनी जीवनदान दिले आहे.चौरे गावानजीक कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा फार्महाऊस असुन शनिवारी सकाळच्या सुमारास तीन अजगराची पिले आढळल्याने उपस्थितांची भितीने धांदल उडाली. चंद्रकांत जोशी फार्म हाऊसचे केअर टेकर यांनी प्रसंगवधान दाखवित तीन अजगराच्या पिल्लांना पकडून  ठेवले. सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल करून घटनास्थळी बोलविलेव तिन्ही अजगराच्या पिल्लांना सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याकडे सर्पुद केले. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी वनपाल एम डी जाधव वनपाल यांना कळवले व त्यांच्या देखरेखीखाली तिन्ही अजगराच्या पिल्लांना जीवनदान देत जंगलात नैसर्गिक आधिवासात सोडले.

Post a Comment

0 Comments