चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपतर्फे मदत केंद्र

 चिपळूण (प्रतिनिधी) : माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण* यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू  यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रत्नागिरी भाजप उपाध्यक्ष केदार साठे व भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन आणि संतोष मालप यांच्या वतीने ब्राह्मण सेवा संघ, चिपळूण येथे केंद्र सुरू केले आहे.          या ठिकाणी वस्तु व मदत संकलित करण्यात येत आहे. अधिक मदत देण्याकरिता व चिपळूणमध्ये येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा. कोणी कुठे काम करायचे आहे, कुठे वस्तूरूप मदत किंवा श्रमदान व अन्य काही मदत याचे नियोजन या केंद्रात केले जाते.        माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार  प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र पद्धतीने व्यवस्था उभी राहण्यासाठीच ब्राह्मण सेवा संघ येथे आपण एकत्रीकरण करत आहोत.         सेंट्रलाईज्ड पद्धतीने हे नियोजन सुरू आहे. जे भाजप कार्यकर्ते येणार आहे त्यांनी किंवा मदतीसाठी जाणार आहेत त्यांनी भाजपचा गमजा किंवा कमळ लावूनच जावे. जास्तीत जास्त कुटुंबांना मोठ्या स्वरूपात मदत करण्यासाठी सुसूत्र पद्धतीने केली जात आहे. पुढील ८ दिवस येथे केंद्र चालू राहणार आहे.          भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे, भाजप आमदार गिरीश महाजन, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने आमदार निरंजन डावखरे यांच्यासह वेळोवेळी दूरध्वनीवरून माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण, आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. सदरची मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क 

श्री. केदार साठे

भाजप जिल्हा उपाध्यक्ष, उत्तर रत्नागिरी

फोन नंबर 9623213838


श्री. अनिकेत पटवर्धन

जिल्हाध्यक्ष, भाजयुमो द. रत्नागिरी

फोन नंबर 9130422333

Post a Comment

0 Comments