कल्याण ग्रामीण मध्ये दुबार पेरणीची टागंती तलवार


 

■वरुण राजाने दडी मारल्याने बळी राजाच्या चिंतेत वाढ

कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण ग्रामीण मध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टागंती तलवार असून वरुणराजाने दडी मारल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. जुन महिना सरला असुन जुलै उगवला तरी पावासाने दडी मारल्याने कल्याण ग्रामीण मधील शेतकरी पेरलेल्या भातांचे रोप वाढणार कसे या विवंचनेत पावासाची प्रतिक्षा करीत आहेत.तोक्ते चक्रीवादळामुळे ठाणे जिल्हात पावसाला सुरुवात झाली. यांनतर पावसाचा हुकमी जुलै महिना सुरु झाला. त्यामुळे या सर्व घटनांचा विचार करुन बळीराजाने भातपेरणी उरकून घेतली. पंरतू यानंतर वरुणराजाने दडी मारल्याने मात्र बळीराजा पूरता हवालदिल झाला आहे. पाऊस अशाच प्रकारे लांबला तर मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भिती देखील शेतकरी वर्गातून व्यक्त केली जातेयं. कोरोनाच्या सततच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.भाजीपाला पिकवूनहीलाँकडाऊनमुळे बाजारपेठा न उपलब्ध झाल्याने शेतमाल रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचे चित्र दिसून आले. आता काही प्रमाणात कोरोनाचे संकट कमी झाले आहे. त्यामुळे यंदा पीक चांगले येईल या आशेवर बळीराजा होता. नूकतेत ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे १ हजार ३४० क्विंटल भात बियाणे ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. यामध्ये 'सुवर्णाजया म्हसोरीकर्जत३,  व ७कोयम्टूर ५१आदी जातींचा समावेश असून सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाणार आहे.काही प्रमाणात पडलेल्या पावसामुळे जमीनीत थोडा ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पंरतू आता पावसाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ज्या ठिकाणी सखल जमीन आहेकिंवा जेथे ओल आहे तिथे कसेतरी भातरोपे उगवली आहेत. परंतू इतर ठिकाणचे काय दिवसेदिवस कडक ऊन पडत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भरच पडत आहे. त्यामुळे कोरोनाने मारलेपण निसर्गाने तारले असे म्हणायचे असेल तर वरुणराजाची कृपा होणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारचे मत गौरीपाडा येथील शेतकरी शंकर म्हात्रेहनुमान म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments