Header AD

लॉकडाउन जिवावर बेतलं...कर्ज बाजारी झालेल्या तरुण व्यावसायिकाची आत्महत्या
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू या लॉकडाउनचा फटका अनेक छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना बसला आहे. लॉकडाउनमुळे  व्यवसाय ठप्प झाल्यामुळे डोंबिवलीतील एका तरुण व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली.


           सुरज सोनी असे आत्महत्या करणाऱ्या  व्यावसायिकाचे नाव असून डोंबिवली पूर्व येथे दावडी भागातील साई गॅलक्सी या इमारतीत तो आपल्या कुटुंबासोबत रहात होते. सोनी यांचे डोंबिवली स्टेशन परिसरात मोबाईल रिपेअरिंग आणि पार्ट्सची खरेदी-विक्री करायचे. यातून मिळालेल्या पैशांवर सुरजच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. परंतू लॉकडाउन सुरु झाल्यापासून सुरजचा व्यवसाय ठप्प झाला.        ज्यामुळे त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.घरात पत्नी आणि दोन मुलांची रोजची होणारी आबाळ, संपत चालेले पैसे या गोष्टींमुळे सुरज अस्वस्थ होते. लॉकडाउनच्या दीड ते दोन वर्षाच्या काळात सुरजने कसंबसं कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होते. सोनी मध्यंतरी त्याने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला.पण त्याला त्यामध्येही अपयश आलं. नंतर सोनी यांची परिस्थिती इतकी खालावली की लाईट बिल भरायला पैसे नसल्यामुळे त्याच्या घरातलं वीज कनेक्शन तोडण्यात आले होते.            थकलेलं घरभाडं, त्यात वीजबीलाचे पैसे नसल्यामुळे तोडलेलं कनेक्शन, बेरोजगारीची कुऱ्हाड यामुळे सुरज पूर्णपणे नैराश्यात गेला. सोमवारी दुपारी सूरजने आपल्या पत्नी आणि मुलांना भावाच्या घरी सोडत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरजला १३ वर्षांचा एक मुलगा आणि ७ वर्षांची एक मुलगी आहे.              मुलाचा सांभाळ व शिक्षण कसे करायचे व आता राहाचे कुठे ही चिंता सूरजच्या पत्नीला लागली आहे काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका प्रिटींग प्रेस व्यवसायिकाने आर्थिक अडणचींमुळे आत्महत्या केली होती. यानंतर अवघ्या काही दिवसांत आणखी एका तरुण व्यवसायिकाने आपलं जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लॉकडाउन जिवावर बेतलं...कर्ज बाजारी झालेल्या तरुण व्यावसायिकाची आत्महत्या   लॉकडाउन जिवावर बेतलं...कर्ज बाजारी झालेल्या तरुण व्यावसायिकाची आत्महत्या Reviewed by News1 Marathi on July 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads