पुरग्रस्तांच्या मदती साठी जिजाऊ संस्था मैदानात मदत नाही कर्तव्य आमचं
कल्याण , कुणाल  म्हात्रे :  २१ व २२ जुलै रोजी संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक गावं पाण्याखाली होती. अनेकांची घरं वाहून गेली या सर्व परिस्थितीत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रस्त्यावर उतरून काम सुरू केलं आहे. याच उपक्रमाअंतर्गत कल्याण मधील राया गावातील आदिवासी पाड्यावर जिजाऊ संघटना रायाचे अध्यक्ष सागर वाकडे, विनोद वाकडे, कपिल वाकडे, विनोद भोईर यांच्या प्रयत्नाने ५० कुटुंबीयांना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले.ज्या ज्या वेळी समाजामध्ये समस्या निर्माण होतात संकट येतात त्या त्या वेळी जिजाऊ संस्था नागरिकांसाठी आधारवड म्हणून उभी राहते. राया गावात किट वाटप करण्यासाठी सर्व कार्यकर्ते नदी नाले ओलांडून खऱ्या नुकसानग्रस्त लोकांपर्यंत पोहचले हे पाहून खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. ज्या ज्या वेळी संकट येतील त्या त्या वेळी जिजाऊ संघटना राया आपल्या सोबत असेल असे शाखा अध्यक्ष सागर वाकडे यांनी सांगितले  यावेळी जिजाऊ संस्था सामाजिक उपक्रम प्रमुख अजित जाधवपडघा विभागातील  नवनाथ वाघेरे, योगेश जाधव, पंडित जाधव, किशोर जाधव, प्रदीप हरी देसले, भोलानाथ वाघेरे, महेंद्र अंभोरे आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments