मंदार केणी यांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रम करून साजरा करण्यात आला

 

       छाया: अशोक घाग

कळवा , प्रतिनिधी  ;   राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उद्योजक मंदार मुकुंद केणी यांचा काल दि २८ जुलै रोजी वाढदिवस कळवा परिसरात समाज उपयोगी कार्यक्रम राबवत साजरा करण्यात आला मंदार केणी यांच्या वाढदिवसा निमित्त आज बुधाजी नगर येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच रक्तदान शिबिर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून नागरिकांनी देखील या शिबिराला उदंड प्रतिसाद दिला.
          त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप व कळवा परिसरातील फेरीवाल्यांना  मोठ्या छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच कोकणामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाले असून त्यामुळे तेथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे त्यांना एक मदतीचा हात म्हणून मंदार केणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोकण वासीयांना जीवनावश्यक वस्तूं कोकणात पाठवण्यात आल्या.         . या संपूर्ण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋताताई आव्हाड नगरसेविका प्रमिलाताई केणी नगरसेवक मिलिंद पाटील नगरसेविका अपर्णा साळवी नगरसेविका आरती गायकवाड परिवहन सदस्य प्रकाश पाटील माझी परिवहन सदस्य  तकी चेऊलकर मयूर केणी  उपस्थित होते.       या शिबिरा प्रसंगी ऋता ताई आव्हाड म्हणाल्या की गेल्या वर्षीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मुकुंद केणी यांचे निधन झाले आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पश्चात मंदार केणी सांभाळलेली आहे वडिलांनी केलेले कामाचा पाठपुरावा प्रभागातील लोकांशी जनसंपर्क लोकांच्या मदतीसाठी अहोरात्र.मेहनत. करणारा मंदार व मोठा भाऊ मयुर केणी वडिलांची जी पाहिलेली स्वप्न होती त्याची पूर्तता मंदार केणी पूर्णपणे करेल असं मला सांगावसं वाटत याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments