ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील


■सध्या आयआयएस येथे 32 क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत, त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण मिळते आहे

 

■नीरज चोप्रा (भालाफेक), अविनाश साबळे (स्टीपल चेस), अन्नू रानी (भालाफेक), एम. स्रीशंकर (लॉंग जंप) टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत

 

 

मुंबई 23 जुलैब्रिजस्टोन इंडिया’चे कर्नाटकमधील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट समवेत चार वर्षांपासून दीर्घ संबंध आहे. बेल्लारी येथील संस्थेत जागतिक पटलावर कीर्तिमान प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या प्रतिभावंत भारतीय क्रीडापटूंचे देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने सर्वसमावेशक ट्रॅक अँड फिल्ड प्रोग्राम सुरू करण्यात आला. ही अशी एकमेव भागीदारी असून यापूर्वीच संस्थेशी निगडीत खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 89 पदके मिळवून यश संपादित केले आहे आणि अगदी अलीकडे या कार्यक्रमातील चार खेळाडू टोकियो ऑलिम्पिककरिता पात्र ठरले आहेत. नीरज चोप्रा (भालाफेक), अविनाश साबळे (स्टीपल चेस), अन्नू रानी (भालाफेक), एम. स्रीशंकर (लॉंग जंप) त्यांच्या क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतील.या क्रीडापटूंना कर्नाटक, विजयनगर येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समधील प्रसिद्ध प्रशिक्षक आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह प्रशिक्षित करण्यात येते. आयआयएस हे भारतामधील पहिले खासगी निधीवरील हाय परफॉरमन्स ट्रेनिंग सेंटर आहे. या संस्थेचा भर हा यशावर असून जागतिक खेळ स्पर्धांमध्ये कीर्तिमान प्रस्थापित करणारे भारतीय ‘चॅम्पियन’ घडविण्यावर आहे. याठिकाणी विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे पुनवर्सन आणि ऑफ-सिझन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सुरक्षित वातावरण तयार करण्यात आले आहे. 2025 पर्यंत ब्रिजस्टोन इंडिया, ब्रिजस्टोन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एथलिटस’ मार्फत धावणे आणि उड्या मारणे, भालाफेक  आणि मध्यम अंतर धावणे अशा विविध क्रीडाप्रकारात पन्नास खेळाडूंना  प्रायोजित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची योजना आखते आहे. 32 खेळाडूंना पूर्ण-प्रायोजित शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या असून त्यांनी निवासी कार्यक्रमात आपले नाव नोंदवले आहे. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या व्यापक विकास आणि मैदानावरील तसेच बाहेरील वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात येते. सध्या या केंद्रात 11 ज्युनिअर आणि युवा राष्ट्रीय विजेते निवासी असून 11 ज्युनिअरनी राष्ट्रीय विक्रम केले आहेत तसेच कार्यक्रम सुरू झाल्यापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 89 पदके प्राप्त केली आहेत.ब्रिजस्टोन इंडिया प्रत्येकाला “चेस युअर ड्रीम”करिता प्रोत्साहन देते आहे आणि आतापर्यंत या चार खेळाडूंच्या यशामुळे आपल्या सर्वांची मान उंचावली आहे. आता हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टोकियो गेम्सकरिता रवाना होत आहेत. या चौघांचे अभिनंदन करताना द इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट’ ने उपलब्ध करून दिलेल्या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमासाठी त्यांचे कौतुक करू इच्छितो. या माध्यमातून इतर अनेक खेळाडूंना जागतिक क्रीडाप्रकारात आपली चमक दाखवणे शक्य होणार आहे. याप्रमाणे अधिकाधिक क्रीडापटूना पाठबळ मिळावे यासाठी शाश्वत वातावरणनिर्मितीकरिता आम्ही वचनबद्ध आहोत. शेवटी कोणीही जन्मत: ऑलिम्पियन नसतो, ऑलिम्पियन घडवावे लागतात” अशा शब्दांत ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांनी आपले मत मांडले.एथलेटीक ही सर्व क्रीडाप्रकारांची जननी मानली जाते आणि ऑलिम्पिक खेळांत सर्वाधिक पदके देऊ करते. ही संस्था सुरू करताना भारताला ऑलिम्पिक खेळाडू तयार करताना मदत होईल असा भक्कम एथलेटीक प्रोग्राम राबविण्याचा विचारही शिवला नव्हता. भारताकडे प्रतिभा आणि भरभरून क्षमता आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. स्वप्न साकार करण्यासाठी आयआयएसची चळवळ उभी राहिली आहे. ब्रिजस्टोन इंडिया’ सारख्या भागीदाराने आमच्यावर विश्वास दाखवला. भारतीय क्रीडाप्रकार वाढीस लागावा म्हणून कॉर्पोरेट इंडियाची भूमिका महत्त्वाची ठरते हे सिद्ध झाले आहे. आज आम्हाला जागतिक दर्जाचे क्रीडापटू घडविण्यास ब्रिजस्टोन इंडिया’ चे मोठे पाठबळ लाभले आहे,” असे इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टचे संस्थापक पार्थ जिंदाल म्हणाले.2018 साली फ्रेंचमन अटोनी याइच यांच्या संकल्पनेतून आयआयएस येथे ब्रिजस्टोन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एथलेटीक्स साकार झाले. प्रतिभावंत ट्रॅक अँड फिल्ड एथलेटचे संगोपन करून त्यांना तयार करण्याचे ध्येय या संस्थेने समोर ठेवले. याठिकाणी आयएएएफ संमत एथलेटीक ट्रॅकसह जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असून स्पोर्ट्स सायन्स, कोचिंग, शिक्षण, पोषण आणि पुन:साह्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. भारताच्या खेळाडूंसाठी पॉवरहाऊस निर्माण करून त्यांना पाठबळ देण्याचे या प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून आगामी काळात त्यांना जागतिक पदके जिंकण्यास मदत होईल.  ब्रिजस्टोन इंडिया’ चे ब्रँड अॅम्बेसेडर हे भारतीय क्रीडा विश्वातील नामांकीत चेहरे आहेत. ज्यामध्ये पद्म विभूषण मेरी कोम (बॉक्सिंग), पद्म श्री साक्षी मलिक (फ्रीस्टाईल रेसलिंग), पद्म भूषण पी व्ही सिंधू आणि पद्म श्री श्रीकांत किदाम्बी (बॅडमिंटन) यांचा समावेश आहे.

 

Post a Comment

0 Comments