भाजपच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
डोंबिवली ( शंकर जाधव ) गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्ता वर भाजपच्या वतीने इयत्ता १० मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि सनदी लेखापाल आणि अभियंता गुणवंत विध्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वार्डातील महिलांना छत्रीचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार , महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे साहेब, अध्यक्षा ज्योती भोईर हे उपस्थित होते. तसेच शहर सरचटणीस भावना मनराजा, नम्रता चव्हाण,रेखाताई पाटील, वासंती कुलकर्णी, राधा झा, अशोक शिंदे, आकाश झाडे, राहुल गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments