फूल मार्केट मधील व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी


राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील यांनी घेतली सभापतींसह तहसीलदारांची भेट....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये देखील पाणी शिरले होते. पुराच्या या पाण्यामुळे येथील फुल मार्केटचे मोठे नुकसान झाले असून फुल मार्केटमधील व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींसह तहसीलदारांची भेट घेतली आहे.


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सखल भागात फुल मार्केट आहे. दिनांक १९ जुलै पासूनसुरु असलेला पाऊस त्यानंतर २२ जुलै रोजी आलेल्या पुरामध्ये संपूर्ण फुल मार्केट काही वेळातच पाण्याखाली गेले. याध्ये अनेक व्यापाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटेगल्लेबिल-बुकलेबल व करेट्स इ. वस्तू तसेच फुले पाण्याच्या पुरात वाहून गेल्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सर्व व्यापाऱ्यांचे झाले आहे.कोरोना काळापासून सतत होणाऱ्या लॉकडाऊन मुळे व बंद असणाऱ्या मंदिरांमुळे फुल विक्री व्यवसायांवर फार मोठा परिणाम झाला. व आता ही नैसर्गिक आपत्ती आली. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.तसेच गेली अनेक वर्षांपासून पावसाळ्यात हे फूल मार्केट पाण्याखाली जात असताना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन मात्र कुठल्याही उपाय योजना करताना दिसत नाहीत. केवळ दररोजच्या पावत्या वसुलीभाडेगाळे वाटप व असंवैधानिक मार्गाने होणारे अनुज्ञप्ती वाटप यातच रस असणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला मात्र शेतकरी व व्यापारी यांच्या दैनंदिन समस्यांशी काहीही देणे घेणे नसल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला असून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल थळे यांची भेट घेत व्यापाऱ्यांच्या सोयी सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. 

Post a Comment

0 Comments