पुराचा फटका....महाड मधील प्राण्यांना - पॉज ची मदत

 
डोंबिवली,  शंकर  जाधव  :  नुकताच आलेल्या पुरामध्ये कोकणातील अनेक प्राण्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे.मुसळधार पावसाने कित्येक गावे पाण्याखाली गेली आहेत. तर विस्थापित नागरिकांना आश्रय देण्यासाठी मदतकेंद्र उभे करण्यात आले आहेत. महाडधील पुराचे पाणी आता ओसरु लागले आहे. मात्र पुराच्या पाण्याचा फटका नागरीकांसह तेथील प्राणी विश्वालाही बसला आहे. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असल्याने येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गुरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.           यात बहुतांश प्राण्यांना गॅस्ट्रोची लागण असण्याची शक्यता असते पॉझ म्हणजेच प्लान्ट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले. महाड मध्ये सध्या सरकारी यंत्रणा, आर्मी, सामाजिक संघटना मदत करत आहेत. पुराचा फटका येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचप्रमाणे येथील पशू पक्ष्यांनाही बसला आहे. त्यामुळे जेव्हापासून पूराचं पाणी ओसारायला लागलं आहे. तेव्हापासून महाड, पाली, लोनेरे, माणगाव आणि इतर शहरातील संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था महाडमध्ये सध्या औषधांचा साठा पुरवत आहेत.प्राण्यांसाठी औषधं, साहित्याचा साठा पाठवला जात आहे.             डोंबिवलीतील पॉझ संस्थेचे कार्यकर्ते महाड या ठिकाणी मदतकार्य करत आहेत. आजारी प्राण्यांना औषधोपचार देत आहे. प्राण्यांना वेळेवर उपचार मिळावे त्यासाठी वेगवेगळ्या भागात शिबीरं लावण्यात आले आहेत. प्राण्यांच्या मदतीसाठी मुंबई, डोंबिवली तसंच कल्याण परिसरातील प्राणी मित्रांकडून मदत मिळवली जात आहेत.
         यात ३०० किलो डॉग फूड, ५० किलो कॅट फूड, घोड्यांचे खाद्य तारपेलिन शिट्स, प्राथमिक उपचारांसाठी लागणारे साहित्य म्हणजेच डेटॉल, अडीच किलो हळद, बेटादिन, कॉटन, सलाईन आणि इतर लागणारी औषधे जमा करून गेल्या आठवड्यापासून पाठवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी, बाकी संस्थेकडून पुन्हा एकदा साहित्य आणि औषधांचा साठा पाठवण्यात आला आहे. तसेच, पॉज संस्थेने दुसऱ्यांदा औषधांचा साठा पुरवला आहे. तर, गुरुवारी पुन्हा एकदा औषधांचा साठा महाडमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती निलेश भणगे यांनी दिली आहे.चौकट


लसीकरणावर भर..
ह्या काळात भटक्या प्राण्यांच्या मुळे कोणतीही रोगराई पसरू नये म्हणून ह्या वेळी पॉज तर्फ़े सेवन इन वन चे लसीकरण करण्यात आले असून पहिल्या दिवशी १५० भटक्या कुत्र्यांना लस दिली गेली आहे आणि ठिक ठिकाणी रेबीज लसीकरण करण्यात आल्याचे संस्थेचे टीम मेंबर प्रशांत बुन्नावार ह्यांनी सांगितले.         २००४ च्या सुनामी पासून ते नेपाळ मधील भूकंप, कुर्ग येथील पूर ते आता महाड मधील पूर , जेव्हा नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती असेल तेव्हा तेव्हा पॉज संस्थे तर्फे आपत्ती निवारण केले जाते असे संस्थेच्या ट्रस्टी अनुराधा रामस्वामी ह्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments